• Download App
    तरुणीला दिली सेक्स सिरीजची नंबरप्लेट, महिला आयोगाच्या दणक्यानंतर परिवहन विभागाने घेतली मागे|The number plate of the sex series given to the young woman was taken back by the transport department after the notice of the women's commission

    तरुणीला दिली सेक्स सिरीजची नंबरप्लेट, महिला आयोगाच्या दणक्यानंतर परिवहन विभागाने घेतली मागे

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीमध्ये एका तरुणीला चक्क सेक्स सिरीजमधील नंबर दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या नंबरप्लेटमुळे या तरुणीला प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. त्याची महिला आयोगाने दखल घेऊन परिवहन आयोगाला नोटीस दिल्यावर ही सिरीजच मागे घेण्यात आली.The number plate of the sex series given to the young woman was taken back by the transport department after the notice of the women’s commission

    दिल्ली महिला आयोगाने परिवहन विभागाला नोटीस जारी केली आहे. एका तरुणीच्या दुचाकीच्या नंबर प्लेटवरील एस.ई.एक्स. ही अक्षरे हटवण्यास सांगितले आहे. या अक्षरांमुळे आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, अशी तक्रार तरुणीने केली. नवीन मालिकेअंतर्गत नोंदणी केलेल्या एकूण वाहनांची संख्याही नमूद करण्यास महिला आयोगाने सांगितले आहे.



    हे प्रकरण समोर आल्याने नंबर प्लेटची संपूर्ण नवीन मालिका रोखण्यात आली आहे. ज्या कुणाकडे या मालिकेची नंबर प्लेट आहे. ते बदलवू शकतात, असे परिवहन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.एका मुलीला एवढ्या छळाला सामोरे जावे लागत आहे. हे लोक इतक्या खालच्या पातळीवरील आणि मानहानीकारक असू शकतात,

    हे अत्यंत दुदैर्वी आहे. या मुलीला आणखी त्रास होऊ नये, यासाठी आपण वाहतूक विभागाला चार दिवसांची मुदत दिली आहे. परिवहन विभागाला सेक्स शब्द असलेल्या आणि या वाटप मालिकेतील नोंदणी केलेल्या एकूण वाहनांची संख्या देण्यास सांगितले आहे, असे दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालिवाल यांनी म्हटले. तसेच मालिकेसंबंधी आलेल्या इतर सर्व तक्रारींची माहिती देण्याची सूचनाही त्यांनी परिवहन विभागाला दिली आहे.

    दिल्लीतील दुचाकींना एस अक्षराने सूचित केले जाते आणि सध्या दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी ई आणि एक्स ही दोन अक्षरे प्रचलित आहेत. त्यामुळे आजकाल दिल्लीतील दुचाकींच्या नंबर प्लेटवर एस आणि ईएक्स असे अक्षर लिहिलेले असते.

    The number plate of the sex series given to the young woman was taken back by the transport department after the notice of the women’s commission

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

     

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र