• Download App
    देशात रुग्णसंख्या पुन्हा वाढली, २४ तासांत २७ हजार रुग्णांची नोंद ; २७७ जणांचा मृत्यू झाल्याने चिंता|The number of patients in the country increased again, 27,000 patients were registered in 24 hours; Anxiety over death of 277 people

    Coronavirus Updates : देशात रुग्णसंख्या पुन्हा वाढली, २४ तासांत २७ हजार रुग्णांची नोंद ; २७७ जणांचा मृत्यू झाल्याने चिंता

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत २६ हजार ७२७ जणांना कोरोना झाला आहे. २७७ जणांचा मृत्यू झाल्याने चिंतेत भर पडली आहे.The number of patients in the country increased again, 27,000 patients were registered in 24 hours; Anxiety over death of 277 people

    गेल्या २४ तासांत २८ हजार २४० जण कोरोनामुक्त झाल्याने दिलासा मिळाला आहे. बुधवारी देशात २३ हजार ५२९ रुग्णांची नोंद झाली तर ३११ जणांचा मृत्यू झाला होता.एकट्या केरळमध्ये १५ हजार ९१४ रुग्णांची नोंद झाली असून १२२ जणांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या कमी झालेली नाही. गेल्या आठवड्यात केरळमध्ये ६० टक्के रुग्ण आढळले होते



    आतापर्यत ८९ कोटी लोकांना लस

    देशात कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रम वेगाने सुरु आहे. आतापर्यंत एकूण ८९ कोटीहून जास्त डोस देण्यात आले आहेत. काल एकाच दिवसात देशात ६४ लाख ४० हजार ४५१ डोस देण्यात आले.

    देशातील सध्याची कोरोना स्थिती : 

    •  एकूण संख्या : तीन कोटी ३३ लाख ६६ हजार ७०७ – कोरोनामुक्त : तीन कोटी ३०लाख ४३ हजार१४४
    •  सक्रिय रुग्णसंख्या : दोन लाख ७५हजार २४४
    • एकूण मृत्यू : चार लाख ४८ हजार ३३९
    • देशात लसीकरण : ८९ कोटी २ लाख ८ हजार ७ डोस

    राज्यातील स्थिती 

    राज्यात गुरुवारी ३,०६३ नवीन रुग्णांची नोंद झाली तर ५६ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासात ३ हजार १९८जण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ७१  हजार ७२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२७ टक्के आहे.

    The number of patients in the country increased again, 27,000 patients were registered in 24 hours; Anxiety over death of 277 people

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य