• Download App
    जगभरातील कोरोनाबळींची संख्या पन्नास लाखांवर; अमेरिकेत सर्वाधिक ७ लाख ४० हजार जणांचा मृत्यू । The number of corona victims worldwide is over five million; The highest death toll in the United States is 740,000

    जगभरातील कोरोनाबळींची संख्या पन्नास लाखांवर; अमेरिकेत सर्वाधिक ७ लाख ४० हजार जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : जागतिक संकट म्हणून ओळखल्या गेलेल्या कोरोनाने सोमवार अखेरपर्यंत जगभरात ५० लाख बळी घेतले आहेत. अमेरिकेत सर्वाधिक७ लाख ४० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. The number of corona victims worldwide is over five million; The highest death toll in the United States is 740,000

    दोन वर्षांत होत्याचे नव्हते झाले. गरीब देशांबरोबरच श्रीमंत देशांची वाट लागली. ते उद्ध्वस्त झाले. प्रथम दर्जाच्या आरोग्य सेवा देतो, असे सांगणाऱ्या देशांच्या तोंडाला फेस आला.

    अमेरिका, युरोपियन महासंघ, ब्रिटन आणि ब्राझील हे सर्व उच्च, मध्यम, किंवा उच्च उत्पन्न असलेले देश एकत्रितपणे जगाच्या लोकसंख्येपैकी एक अष्टमांश आहेत. परंतु मृत्यूंच्या संख्येपैकी जवळजवळ निम्मी संख्या या देशांतील आहे. फक्त अमेरिकेतच  ७ लाख ४० हजारांहून अधिक लोकांचे बळी गेले आहेत, जे इतर देशापेक्षा जास्त आहेत.



    जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार मृतांची संख्या लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्कोच्या एकत्रित लोकसंख्येएवढी आहे. पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ओस्लोच्या अंदाजानुसार, १९५० पासून विविध राष्ट्रांमधील लढाईत मारल्या गेलेल्या लोकांइतकीच कोरोनाबळींची संख्या आहे. हृदयविकार आणि पक्षाघातानंतर, कोरोना हे मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे.

    कोरोनाच्या उद्रेकानंतर २२ महिन्यांत विषाणू रशिया, युक्रेन आणि पूर्व युरोपच्या इतर भागामध्ये अधिक प्रमाणात पसरत आहे. युक्रेनमध्ये १७ टक्के प्रौढ लोकसंख्येचे पूर्ण लसीकरण झाले आहे, तर अर्मेनियामध्ये, फक्त ७ टक्केच लसीकरण झाले आहे.

    भारताला लसीकरण मोहिमेने तारले

    मे महिन्याच्या सुरुवातीस भारतात डेल्टा विषाणूची लाट येऊन गेली. प्रभावी लसीकरणामुळे रशिया, अमेरिका किंवा ब्रिटनच्या तुलनेत भारतात दैनंदिन मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे. भारतासामध्ये, वैद्यकीय उपचारांशिवाय लोक घरीच मृत्युमुखी पडल्याने एकूण कोरोनाबळींची संख्या ही निश्चितच कमी आहे.

    The number of corona victims worldwide is over five million; The highest death toll in the United States is 740,000

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसेत वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी चौथी अटक; आरोपींनी मृताच्या घराची तोडफोड केली