• Download App
    जगामध्ये कोरोना बळींची संख्या ५० लाखांवर ; दोन वर्षातील चित्र ; वर्षात गेले २५ लाख बळी|The number of corona victims in the world is over 50 lakh ; Two-year picture; 25 lakh victims in a year

    जगामध्ये कोरोना बळींची संख्या ५० लाखांवर ; दोन वर्षातील चित्र ; वर्षात गेले २५ लाख बळी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : जगात कोरोना बळींची संख्या ५० लाखांवर गेली आहे. गेल्या दोन वर्षातील हे धक्कादायक चित्र आहे. अमेरिकेत अन्य देशांच्या तुलनेत अधिक बळी गेले. तब्बल ७ लाख लोक एकट्या अमेरिकेत मृत्यू पावले आहेत.The number of corona victims in the world is over 50 lakh ; Two-year picture; 25 lakh victims in a year

    रॉयटर वृत्तसंस्थेने याबाबतचा अहवाल सादर केला असून त्यात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. गेल्या दोन वर्षातील ही आकडेवारी आहे.पहिल्या वर्षात गेले २५ लाख बळी गेले. तर केवळ २३६ दिवसांत आणखी २५ लाख लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.



     

    कोरोनाचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला आहे. तब्बल ७ लाख लोक मृत्युमुखी पडले आहेत.जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटीच्या आकडेवाडीनुसार १०८ दिवसात ६ लाख बळी पडले होते. त्यानंतर कोविडच्या डेल्टा वैरिएंटमुळे अमेरिकेत मोठे संकट निर्माण झाले.

    परिस्थिती पुन्हा अधिकच बिघडली. कोरोना रुग्ण आणि रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्या वाढली. तसेच मृत्यूचे प्रमाणही झपाट्याने वाढले. अनेकांनी निष्काळजीपणे कोरोनाविरोधी लस घेतली नाही. त्यामुळे अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली. मृत्यूचा आकडा सहा लाखांवरून ७ लाखांवर पाहता पाहता पोचला.

    The number of corona victims in the world is over 50 lakh ; Two-year picture; 25 lakh victims in a year

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi AAP :दिल्लीत AAP वर आणखी एका घोटाळ्याचा आरोप; प्रतिभा विकास योजनेत 145 कोटींचा घोटाळा; एलजींनी दिले चौकशीचे आदेश

    Chhangur Baba : छांगूर बाबाच्या 14 ठिकाणी EDचे छापे; पहाटे 5 वाजता बलरामपूर आणि मुंबईत पोहोचली पथके

    Bangladesh Violence : बांगलादेशात हिंसाचार, गोळीबारात 4 जणांचा मृत्यू; शेख हसीना यांच्या गावी रॅलीदरम्यान निदर्शक आणि पोलिसांमध्ये संघर्ष