• Download App
    पंतप्रधान जन धन योजनेचा आलेख चढता, सहा वर्षांत खातेदारांची संख्या तिप्पट; अडीच लाख रुपयांचा मिळणार लाभ The number of account holders has tripled in six years, as the graph of the Prime Minister's Jan Dhan Yojana rises; The benefit will be Rs. 2.5 lakhs

    पंतप्रधान जन धन योजनेचा आलेख चढता, सहा वर्षांत खातेदारांची संख्या तिप्पट; अडीच लाख रुपयांचा मिळणार लाभ

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली :पंतप्रधान जनधन योजनेने भरीव प्रगती केली असून या खात्यांची संख्या तिप्पट झाली आहे. गेल्या सहा वर्षातील आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. The number of account holders has tripled in six years, as the graph of the Prime Minister’s Jan Dhan Yojana rises; The benefit will be Rs. 2.5 lakhs

    पंतप्रधान जनधन योजनेला नागरिकांनी मोठी पसंती दिली आहे. देशातील प्रत्येक नागरिकांचे बँकेत खाते असावे, या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने जन धन योजना 2015 मध्ये सुरु केली. योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून खातेदारांची संख्या तिप्पट झाली आहे. 2015 मध्ये 14.72 कोटी जणांनी बँकेत खाते उघडले. जुलै 2021 अखेर खातेदार यांची संख्या 42.76 कोटींवर पोचली आहे. 15 मार्चअखेर 15670 कोटी तर 21 मार्च अखेर ही रक्कम 145, 551 कोटी रुपये एवढी रक्कम खात्यांत खातेदारांनी जमा केली.


    खातेदाराला खात्यात रक्कम नसताना खाते उघडता येते. ग्राहकाला 10 हजारांचा ओव्हरद्राफ्टची सुविधा दिली जाते. सेव्हिंग खात्याप्रमाणे व्याज मिळते. मोबाईल बँकिंग सुविधा आहे. रूपे कार्डने पैसे काढता आणि थेट ऑनलाइन व्यवहार करता येतात.

    कोण काढू शकतो खाते

    दहा वर्षांवरील कोणतीही व्यक्ती जन धन खाते काढू शकतो. सार्वजनिक भागातील कोणत्याही बँकेत खाते काढता येते. विशेष म्हणजे तुमचे सध्याचे बचत खात्याचे रूपांतर तुम्ही जन धन खात्यात करु शकता.

    कोणती कागदपत्रे खाते खोलण्यासाठी लागतात

    जन धन खाते उघडण्यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रॉयव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड या कागडपत्राच्या आधारे खाते उघडता येते.

    अडीच लाख रुपयांचा फायदा

    •  जन धनच्या खातेदारांना 2.30लाखांचा फायदा मिळतो.
    •  कोणत्याही बँकेत जन धन काढणाऱ्याला विमा कव्हर मिळते.
    •  खातेदाराला 1 लाखांचा अपघात विमा मिळतो.
    •  सामान्य विमा राशी 30 हजार असते
    •  खातेदाराचा अपघात झाल्यास 30 हजार दिले जातात.
    •  अपघातात मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये दिले जातात.
    •  वरील एकूण रक्कम पाहता 2.30 लाखाचा लाभ

    The number of account holders has tripled in six years, as the graph of the Prime Minister’s Jan Dhan Yojana rises; The benefit will be Rs. 2.5 lakhs

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार