• Download App
    टेम्पल रनच्या पुढे धाव : नोटांवर गांधींसह लक्ष्मी + गणपतीचा फोटो हवा; अरविंद केजरीवालांची मागणीThe notes have a photograph of Lakshmi - Ganapati with Gandhi; Arvind Kejriwal's demand

    टेम्पल रनच्या पुढे धाव : नोटांवर गांधींसह लक्ष्मी + गणपतीचा फोटो हवा; अरविंद केजरीवालांची मागणी

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केंद्र सरकारकडे महात्मा गांधींसह गणपती आणि लक्ष्मी यांची प्रतिमा भारतीय चलनी नोटांवर लावण्याची मागणी केली आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी अर्थव्यवस्थेची चांगली स्थिती आणि देशाला विकसित करण्यासाठी देव-देवतांचा आशीर्वाद आवश्यक असल्याचे सांगितले. नोटेच्या एका बाजूला गांधींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी-गणेशाचा फोटो असायला हवा, असे ते म्हणाले. यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिणार आहेत. The notes have a photograph of Lakshmi – Ganapati with Gandhi; Arvind Kejriwal’s demand

    या देशात हिंदुत्वावर मते मिळायला लागल्यानंतर अनेक धर्मनिरपेक्ष नेते हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे मात्र हेच नेते अल्पसंख्याकांच्या मेळाव्यात वेगळी भाषा बोलताना दिसतात.



    निवडणुका आल्या की हे नेते देवळा देवळांमध्ये जाऊन दर्शने घ्यायला लागतात. आता दिवाळीच्या मुहूर्तावर केजरीवाल यांनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो लावण्याची मागणी केली आहे. दिवाळीच्या रात्री पूजा करताना हा विचार त्यांच्या मनात आल्याचे त्यांनी सांगितले. आपले अनेकांशी बोलणे झाले असून यावर कोणाचाही आक्षेप नसावा असेही ते म्हणाले. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या कमजोरीचा संदर्भ देत केजरीवाल म्हणाले की, देवी-देवतांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतो तेव्हा प्रयत्नांना यश मिळते. अरविंद केजरीवाल म्हणाले की, “भारत हा एक श्रीमंत देश व्हावा आणि प्रत्येक भारतीयाने श्रीमंत कुटुंब व्हावे, अशी आपली सर्वांची इच्छा आहे. यासाठी बरीच पावले उचलावी लागतील. मोठ्या प्रमाणात शाळा उघडायच्या आहेत, रुग्णालये बांधायची आहेत. पायाभूत सुविधा निर्माण करायच्या आहेत. पण प्रयत्नांना यश तेव्हाच मिळेल जेव्हा आपल्याला देवी-देवतांचा आशीर्वाद असेल. अनेकवेळा आपण पाहतो की, प्रयत्नांचे फळ येत नाही, मग असे वाटते की, देवी-देवतांचा आशीर्वाद असेल तर त्याचे फळ नक्कीच मिळू शकते.

    केजरीवाल पुढे म्हणाले, “आदल्या दिवशी दिवाळी होती, आम्ही सर्वांनी गणेश आणि लक्ष्मीची पूजा केली. आम्ही शांततेसाठी प्रार्थना केली. आज मी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांना आवाहन करतो की, भारतीय चलनावर एकीकडे गांधीजींचे चित्र आहे, ते असेच राहावे, दुसऱ्या बाजूला गणेशजी आणि लक्ष्मीजींचे चित्र लावावे.

    केजरीवाल पुढे म्हणाले की, आता छापल्या जाणाऱ्या सर्व नवीन नोटांवर लक्ष्मी आणि गणेशाचे चित्र असले पाहिजे. इंडोनेशियाचे उदाहरण देताना ते म्हणाले, “आम्ही म्हणत नाही की सर्व नोटा बदलल्या पाहिजेत, परंतु ज्या नवीन नोटा छापल्या जातात त्यावरून ते सुरू केले जाऊ शकते. हळूहळू नवीन नोटा चलनात येतील. इंडोनेशिया हा मुस्लिम देश आहे. येथे 85 % मुस्लिम, 2 टक्क्यांहून कमी हिंदू आहेत. तरीही त्यांनी आपल्या नोटेवर गणेशाचे चित्र छापले आहे. हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे, जे केंद्र सरकारने उचलले पाहिजे, असे केजरीवाल म्हणाले.

    The notes have a photograph of Lakshmi – Ganapati with Gandhi; Arvind Kejriwal’s demand

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मोठी बातमी! अमृतसरमधून दोन ISI हेरांना अटक

    Pakistan पाकिस्तानच्या युद्धाच्या पोकळ धमक्या; पण त्या देशात फक्त 96 तास पुरेल एवढाच दारूगोळ्याचा साठा!!

    सत्काराकडे पाठ फिरवून 5 माजी मुख्यमंत्र्यांकडून अजितदादांच्या राष्ट्रवादीचा “करेक्ट साईज कार्यक्रम”; एक विद्यमान आणि दोनच माजी मुख्यमंत्री हजर!!