Thursday, 8 May 2025
  • Download App
    No Confidence Motion : अविश्वास प्रस्तावावर ८ ऑगस्टपासून संसदेत चर्चा होणार, तिसऱ्या दिवशी मोदी देणार उत्तर! The no confidence motion will be discussed in Parliament from August 8 Modi will give an answer on the third day

    No Confidence Motion : अविश्वास प्रस्तावावर ८ ऑगस्टपासून संसदेत चर्चा होणार, तिसऱ्या दिवशी मोदी देणार उत्तर!

    parliament monsoon session should be extended to make up for lost time says rjd leader manoj jha

    ८ ते १० ऑगस्ट दरम्यान अविश्वास ठरावावर चर्चा होणार आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : विरोधी आघाडी ‘I.N.D.I.A’ने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर सतत चर्चा करण्याची मागणी होत होती. अखेर आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनात याबाबतची तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार ८ ऑगस्ट रोजी सभागृहात अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. The no confidence motion will be discussed in Parliament from August 8 Modi will give an answer on the third day

    ही चर्चा एकूण तीन दिवस चालणार आहे. म्हणजेच ८ ते १० ऑगस्ट दरम्यान अविश्वास ठरावावर चर्चा होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे चर्चेच्या तिसऱ्या दिवशी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या अविश्वास प्रस्तावावर उत्तर देणार आहेत.

    पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधी पक्ष मणिपूर हिंसाचारानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या भाषणाची मागणी करत होते. मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान मोदींनी सभागृहात बोलावे, अशी विरोधी पक्षांची मागणी होती. २६ जुलै रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच लोकसभेत मांडला होता.

    सहसा अविश्वास ठरावादरम्यान सत्ताधारी पक्षांसाठी धोका निर्माण होतो. या काळात अनेक वेळा सरकारेही पडली आहेत. मात्र, यावेळी मोदी सरकारला अविश्वास प्रस्तावापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही. कारण लोकसभेत सरकारकडे पुरेसे संख्याबळ आहे.

    The no confidence motion will be discussed in Parliament from August 8 Modi will give an answer on the third day

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    द फोकस एक्सप्लेनर : भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’- 1971 नंतरचा सर्वात मोठा प्रतिहल्ल! 5 मुद्दे

    भारताने 13 देशांना ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली, या ४ मुद्द्यांवर होता फोकस

    Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये जवानांनी २२ नक्षलवाद्यांना केले ठार, १८ जणांचे मृतदेह सापडले