• Download App
    संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे पुढचे पाऊल, रणगाडाविरोधी हेलिना क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी|The next step in self-reliance in the defense sector, successful test of the anti-tank Helena missile

    संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे पुढचे पाऊल, रणगाडाविरोधी हेलिना क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे आणखी एक पाऊल पुढे पडले. रणगाडाविरोधी हेलिना या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची पोखरणच्या वाळवंटात यशस्वी चाचणी घेण्यात आली. हेलिकॉप्टरमधून मारा करून रणगाडे तसेच चिलखती वाहने नष्ट करण्याची हेलिना क्षेपणास्त्रामध्ये क्षमता आहे.The next step in self-reliance in the defense sector, successful test of the anti-tank Helena missile

    संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. स्वदेशी बनावटीच्याच अ‍ॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर वरून घेण्यात आल्या. पोखरणच्या वाळवंटात घेण्यात आलेल्या या चाचण्यांत इन्फ्रारेड इमेजिंग सीकरद्वारे लॉक ऑन बिफोर लॉन्च मोडमध्ये रणगड्यांवर अचूक लक्ष्य साधण्यात आले.


    डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की हेलिना क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये सर्व प्रकारच्या हवामानात आणि रात्रीही मारा करण्याची क्षमता आहे. पारंपरिक चिलखती वाहने, रणगाडे यांना हे क्षेपणासत्र नष्ट करू शकते. लष्कर आणि हवाई दल या दोन्हीमध्ये हेलिकॉप्टरच्या एकत्रीकरणासाठी हे क्षेपणास्त्र विकसित केले गेले आहे.

    हेलिनाच्या वायुसेना आवृत्तीलाध्रुवस्त्र म्हणून संबोधले जाते.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी यांनी हेलिनाच्या विकास आणि चाचण्यांमध्ये सहभागी असलेल्या टीमचे अभिनंदन केले आहे.

    The next step in self-reliance in the defense sector, successful test of the anti-tank Helena missile

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!