विशेष प्रतिनिधी
मुबंई : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील बऱ्याच सेलिब्रिटींची नावे ड्रग प्रकरणात आली आहेत. दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, राकुल प्रीत, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती त्यानंतर आता आर्यन खान हे सर्वजण एनसीबीच्या रडारवर आहेत. या प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
The need to clean up drugs in Indian cinema: Union Minister Ramdas Athavale
आठवले म्हणतात, भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात अधिक ड्रग्ज विकले जातात. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये स्वच्छता करण्याची खूप जास्त गरज आहे. चित्रपटसृष्टीमधील अमली पदार्थांचा वापर वाढला आहेच. चित्रपटसृष्टीतील लोक सर्रास ड्रग्जचा वापर करतात आणि यामध्ये बदल घडवून आणण्याची खूप जास्त गरज आहे. जे लोक ड्रग्जचा वापर करतात त्यांना व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये पाठवण्यात यावे. त्यांना अटक केली जाऊ नये किंवा तुरुंगात देखील टाकू नये.
वानखेडे यांची नोकरी जातेय का मलिकांचे मंत्रीपद हेच बघू, रामदास आठवले यांचे आव्हान
पुढे रामदास आठवले म्हणतात, जे लोक दारू पितात, सिगारेट ओढतात त्यांना आपण तुरुंगामध्ये पाठवत नाही. परंतु ज्यांच्याकडे अमली पदार्थांचे प्रमाण कितीही असले तरी त्यांना तुरुंगात टाकले जाते. इथे बदलण्याची गरज आहे. आणि अमली पदार्थांचे व्यसन हे चुकीचे व्यसनच आहे.
आर्यन खानच्या केसबाबत बोलताना ते म्हणाले, आर्यन खानवरील कारवाईमध्ये बिलकूल पक्षपातीपणा केला गेलेला नाहीये. त्याच्याविरोधात एनसीबीकडे भक्कम पुरावे असावेत म्हणून त्याला कोर्टाकडून जामीन मिळाला नसावा.
The need to clean up drugs in Indian cinema: Union Minister Ramdas Athavale
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपावर शिवसेनेने प्रथमच व्यक्त केले मत
- साताऱ्यात ऑक्सिजन येतो तो उदयनराजेंमुळे ; शिवेंद्रराजे यांचा घणाघात , DCC बँक आणि पालिकेवरून वाढला वाद
- अनंत गीते बंडाच्या पवित्र्यात? गीते समर्थकांचे राजीनामे
- गुप्त माहिती लीक केल्याप्रकरणी सीबीआयची नौदल अधिकाऱ्याला अटक, नौदलाचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश