दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेत मागे दिसत असलेल्या राष्ट्रध्वजात हिरवा रंग जास्त असल्याची तक्रार केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी केली आहे. The national flag behind Kejriwal is more green, the Union Minister complained to the Lieutenant Governor
प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेत मागे दिसत असलेल्या राष्ट्रध्वजात हिरवा रंग जास्त असल्याची तक्रार केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी केली आहे.
अरविंद केजरीवाल पत्रकार परिषद घेताना त्यामागे राष्ट्रध्वज असतो. त्यामध्ये हिरवा रंग जास्त असल्याचे पटेल यांनी म्हटले आहे. पटेल यांनी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांना पत्र लिहून केजरीवालांची तक्रार केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी पत्रात म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून मी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषद पाहातोय. त्यांच्या मागे दोन राष्ट्रध्वज दिसतात. त्यात सफेद रंगाचं स्थान कमी करुन हिरव्या रंगाला जास्त स्थान देण्यात आल्याचे दिसून आलं आहे. यासंदर्भात मी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिलं आहे आणि उपराज्यपालांनाही पत्र पाठवलं आहे.
अरविंद केजरीवाल जेव्हा पत्रकार परिषद घेतात तेव्हा त्यांच्या मागे उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रध्वजांमध्ये हिरव्या रंगाचं स्थान अधिक देण्यात आलं आहे आणि हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नियमांचं उल्लंघन आहे, असंही पटेल यांनी पत्रात नमूद केलं आहे. यात तात्काळ सुधारणा करावी.
प्रत्येक पत्रकार परिषदेत त्यांच्या मागे दोन राष्ट्रध्वज पाहायला मिळतात. याच राष्ट्रध्वजांमधून नियमांचं उल्लंघन केजरीवाल करत असल्याचं केंद्रीय मंत्री पटेल यांचं म्हणणं आहे.
The national flag behind Kejriwal is more green, the Union Minister complained to the Lieutenant Governor
महत्त्वाच्या बातम्या
- Monsoon Updates : नैर्ऋत्य मान्सून बंगालच्या उपसागराकडे वळला, 31 मेपर्यंत केरळला पोहोचण्याची शक्यता
- राज्यात लॉकडाऊन आणखी १५ दिवस वाढविण्याचा विचार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
- अनाथांना आधार, देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले ११० अनाथ मुलांचे पालकत्व
- CBSE 12th Board Exam 2021 : बारावीची परीक्षा रद्द होणार की नाही, सोमवारी येणार सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
- Corona Cases In India : देशात 44 दिवसांनंतर सर्वात कमी रुग्ण आढळले, 24 तासांत 1.86 लाख रुग्णांची नोंद