• Download App
    उमेदवाराचे नाव एम. एस. धोनी, वडीलांचे नाव सचिन तेंडूलकर, तरीही छत्तीसगढ शिक्षण विभागाने शिक्षक पदाच्या मुलाखतीसाठी बोलावले|The name of the candidate is M. S. Dhoni, father's name Sachin Tendulkar, still called by Chhattisgarh education department for teacher interview

    उमेदवाराचे नाव एम. एस. धोनी, वडीलांचे नाव सचिन तेंडूलकर, तरीही छत्तीसगढ शिक्षण विभागाने शिक्षक पदाच्या मुलाखतीसाठी बोलावले

    विशेष प्रतिनिधी

    रायपूर : छत्तीसगढच्या शिक्षण विभागातील सावळा गोंधळ समोर आला आहे. उमेदवाराचे नाव एम. एस. धोनी आणि वडीलांचे नाव सचिन तेंडूलकर असे असूनही शिक्षक पदाच्या मुलाखतीसाठी एकाला बोलावण्यात आले. मात्र, हा उमेदवारच मुलाखतीला न आल्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला.The name of the candidate is M. S. Dhoni, father’s name Sachin Tendulkar, still called by Chhattisgarh education department for teacher interview

    सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीपेक्षा भारतीय क्रिकेटमध्ये मोठी नावे नाहीत. तरीही रायपूरमध्ये शिक्षक पदासाठी अर्ज केलेल्या एका व्यक्तीने स्वत:चे नाव एम. एस. धोनी आणि वडीलंचे नाव सचिन तेंडुलकर असे लिहिले. मात्र, कोणालाही याबाबत शंका आली नाही.

    त्यामुळे त्याला मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. मात्र, ही व्यक्ती मुलाखतीला आलीच नाही. त्यामुळे मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी अर्ज बनावट असल्याचे समजले. त्यांनी फॉर्मवर नमूद केलेल्या क्रमांकावर फोन केला.

    शिक्षक पदासाठी अर्ज केलेल्या या तथाकथित एम.एस. धोन याने एसव्हीटीयू विद्यापीठ, दुर्ग येथून अभियांत्रिकीची पदवी घेतली. हा अर्ज व्हायरल झाला आहे. त्यामुळे बनावट अर्ज करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मात्र, मुळात प्रश्न उपस्थित होतो की या प्रकारचे नाव असतानाही हा अर्ज मुलाखतीसाठी पात्र कसा ठरविण्यात आला? संपूर्ण प्रक्रियेतच घोळ नाही ना असेही बोलले जात आहे. त्यामुळे याबाबतची चौकशी झाल्यास गलथानपणा करणाºयांचीही नाव समोर येणार आहेत.

    The name of the candidate is M. S. Dhoni, father’s name Sachin Tendulkar, still called by Chhattisgarh education department for teacher interview

    विशेष प्रतिनिधी

     

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य