• Download App
    व्हायरल व्हिडीओत मृत्यू दिसलेल्या धनबादच्या न्यायाधीशांचा खूनच, हेतूपुरस्सरपणे दिला होता धक्का|The murder of the Dhanbad judge, who was seen dead in a viral video, was a deliberate push

    व्हायरल व्हिडीओत मृत्यू दिसलेल्या धनबादच्या न्यायाधीशांचा खूनच, हेतूपुरस्सरपणे दिला होता धक्का

    विशेष प्रतिनिधी

    धनबाद : गेल्या वर्षी जुलै महिन्यात व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये धनबाद येथील एका न्यायाधिशाचा रिक्षाच्या धडकेने मृत्यू झाल्याचे दिसले होते. या घटनेने सर्वांना हादरविले होते. या न्यायाधिशांचा खूनच झाल्याचे आता समोर आले आहे. त्यांना हेतूपुरस्सरपणे धक्का मारण्यात आला होती अशी माहिती सीबीआयच्या तपासात समोर आली आहे.The murder of the Dhanbad judge, who was seen dead in a viral video, was a deliberate push

    झारखंडच्या धनबादमधील अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या मृत्यूबाबत सीबीआयला महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. सीबीआयने न्यायालयाला सांगितले की, न्यायाधीशांना हेतूपुरस्सरपणे धक्का मारण्यात आला होता. क्राईम सीन रिक्रीएशनमध्ये ते सहभागी होते. घटनास्थळी ते दोनदा गेले होते. सायकॉलॉजिकल असेसमेंटनुसार त्यांनी क्राईन सीनच्या अहवालावर स्वाक्षरी केली आहे.



    सीबीआयचे विशेष न्यायाधीश रजनीकांत पाठक यांच्या न्यायालयात याबाबत सुनावणी झाली. जेलमध्ये असलेला रिक्षा चालक लखनकुमार वर्मा व त्याचा साथीदार राहुल कुमार वर्मा याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आले. सीबीआयने सीएफएसएलचे प्रधान शास्त्रज्ञ अमोद कुमार सिंह यांची साक्ष नोंदवली.

    त्याचबरोबर गोविंदपूरस्थित पट्रोल पंपाच्या दोन कर्मचाऱ्यांनीही साक्ष दिली. यातील शमशेर अली अन्सारीने न्यायालयात लखन वर्मा याची ओळख रिक्षाचालकाच्या रुपात केली. त्याने जबाबात म्हटले आहे की, २७ जुलै २०२१च्या सायंकाळी ६.३० ते २८ जुलै २०२१ रोजी सकाळी ६.३० पर्यंत त्याची पंट्रोल पंपावर ड्यूटी होती. त्याचे काम संपण्यापूर्वी आलेल्या एका आॅटो रिक्षात त्याने डिझेल भरले होते.

    विशेष म्हणजे झारखंड हायकोटार्ने न्यायाधीशांच्या मृत्यू प्रकरणात व्हॉटसॲपच्या भारत प्रमुखांना प्रतिवादी बनविले असून, जबाब दाखल करण्यास सांगितले आहे. तपासात एका व्हॉटसॲप चॅटची माहिती मिळाली आहे. संपूर्ण चॅटचा तपशील मिळाल्यानंतर तपासाला गती मिळणार आहे.

    धनबाद येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक ८ उत्तम आनंद हे सकाळी चालण्यासाठी गेले असताना एका आॅटोरिक्षाने त्यांना उडवले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. सर्वोच्च न्यायालयाने ३० जुलै रोजी या घटनेची स्वयंस्फुतीर्ने (सुओ मोट) दखल घेतली. सीसीटीव्ही फुटेजनुसार, रिक्षा ज्या प्रकारे आनंद यांच्या दिशेने आली, त्यावरून हा अपघात नसून जाणूनबुजून केलेले कृत्य असावे असा दाट संशय व्यक्त करण्यात आला.

    २८ जुलै रोजी सकाळी न्यायाधीश आनंद रणधीर वर्मा चौकातून चालत जात होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे दिसत आहे त्यानुसार, त्यावेळी रस्ता जवळपास रिकामा होता आणि आनंद या रस्त्याच्या एका कडेने जात होते. असे असूनही एका मोठ्या रिक्षाने त्यांना मागच्या बाजूने उडवले आणि रिक्षा घटनास्थळावरून निघून गेली. आसपासच्या लोकांनी आनंद यांना जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

    The murder of the Dhanbad judge, who was seen dead in a viral video, was a deliberate push

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त