• Download App
    श्रीनगरमध्ये तब्बल 30 वर्षा नंतर सिल्वर स्क्रीनवर आला सिनेमा; मल्टिप्लेक्सचा शुभारंभ!! |The movie came to the silver screen after 30 years in Srinagar; Launch of Multiplex!!

    श्रीनगरमध्ये तब्बल 30 वर्षा नंतर सिल्वर स्क्रीनवर आला सिनेमा; मल्टिप्लेक्सचा शुभारंभ!!

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : दहशतवादाच्या आगीत होरपळून निघालेल्या जम्मू-काश्मीमध्ये आता पुन्हा चांगले दिवस येत आहेत. या राज्यात तब्बल 30 वर्षांनी पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रिन सिनेमा पहाता येणार आहे. श्रीनगर येथे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी मंगळवारी मल्टीप्लेक्सचे उद्घाटन केले. अब्दुल्ला – मुफ्तींच्या राजवटीत बंद झालेली सिनेमागृहे पुन्हा गजबलायला सुरुवात झाली आहे The movie came to the silver screen after 30 years in Srinagar; Launch of Multiplex!!



    यापूर्वी देखील अनेकदा काश्मीरमध्ये सिनेमा हॉल सुरू करण्याचे प्रयत्न झाले, मात्र ते यशस्वी होऊ शकले नव्हते. श्रीनगरमध्ये सुरू झालेल्या मल्टिप्लेक्समध्ये ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट दाखवला जात आहे. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा देखील प्रेक्षकांसोबत हा चित्रपट पाहिला. यावेळी मनोज सिन्हा म्हणाले की, आम्ही लवकरच जम्मू-काश्मीरच्या प्रत्येक जिल्ह्यात सिनेमा हॉल बनवू. अनंतनाग, बांदीपोरा, गंदरबल, डोडा, राजौरी, पूंछ आणि किश्तवाडमध्ये असे सिनेमा हॉल बांधले जातील. सिनेमा हे एक सशक्त सर्जनशील माध्यम आहे, जे लोकांची संस्कृती आणि मूल्ये प्रतिबिंबित करते. हे जगासाठी ज्ञान, नवनिर्मितीची दारे उघडते आणि लोकांना एकमेकांच्या संस्कृतीची चांगली समज देते असे सिन्हा यांनी सांगितले.

    फारुख अब्दुल्ला सरकारने 1999 मध्ये सिनेमा हॉल पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. रिगल, नीलम आणि ब्रॉडवे सिनेमा हॉलमध्येही चित्रपट दाखवण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र रिगल सिनेमाच्या पहिल्या शोदरम्यान दहशतवादी हल्ला झाला. त्या घटनेत एक जण ठार आणि 12 जण जखमी झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा चित्रपटगृहे बंद करण्यात आली. एकट्या श्रीनगरमध्ये 10 सिनेमा हॉल होते, ज्यामध्ये बॉलीवूडचे चित्रपट दाखवले जात होते. काश्मीरमधील अनेक जुनी चित्रपटगृहे नंतर रुग्णालये आणि व्यावसायिक केंद्रांमध्ये बदलली गेली किंवा सुरक्षा दलांसाठी तात्पुरती शिबिरे म्हणून वापरली गेली.

    The movie came to the silver screen after 30 years in Srinagar; Launch of Multiplex!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य