• Download App
    भारताच्या भेदक आकाशच्या यशस्वी चाचणीने चीनची वाढली डोकेदुखी । The modified ground system of the existing 'Akash' weapon system successfully completed its trial. Its new threatening weapon in the armory of India.`

    भारताच्या भेदक आकाशच्या यशस्वी चाचणीने चीनची वाढली डोकेदुखी

    संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओच्या) परिश्रमांना आणखी एक यश आले आहे. सोमवारी संध्याकाळी साडेचार वाजता ओडिशातील चांदीपूर येथून झेपावलेल्या क्षेपणास्त्राने मानवरहित हवाई लक्ष्याचा अचूक भेद करत ते नष्ट केले. या यशामुळे भारताच्या हवाई ताकदीमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. सीमेवरील शत्रुंना हा जोरदार इशारा मानला जात आहे. The modified ground system of the existing ‘Akash’ weapon system successfully completed its trial. Its new threatening weapon in the armory of India.


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली :  ‘आकाश प्राइम’ या क्षेपणास्त्राने त्याच्या पहिल्याच उड्डाण चाचणीमध्ये शत्रूच्या विमानाची नक्कल असणाऱ्या मानवरहित हवाई लक्ष्याचा अचूक भेद करत ते नष्ट केले. या यशामुळे भारताच्या क्षेपणास्त्र शस्त्रागाराची भेदकता वाढली असून देशाचे हवाई संरक्षण आणखी मजबूत झाले आहे. आकाश प्राईमच्या यशस्वीतेमुळे चीनची डोकेदुखीही वाढली आहे. कारण गेल्या वर्षी भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर भारतीय लष्कराने लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आकाश हवाई संरक्षण यंत्रणा तैनात केली आहे.

    डीआरडीओने सोमवारी दुपारी ओडिशाच्या चांदीपूर येथे आकाश क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची चाचणी यशस्वी केली. भारतीय हवाई दलाने ग्वाल्हेर (महाराजपूर एएफएस), जलपायीगुडी (हसीमारा एएफएस), तेजपूर, जोरहाट आणि पुणे (लोहेगाव एएफएस) येथील तळांवर आकाश प्राईम तैनात केले आहे. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी डीआरडीओ, भारतीय सैन्यदल भारतीय वायूदल आणि अन्य संबंधित संशोधकांचे अभिनंदन केले आहे.



    आकाश प्राइम क्षेपणास्त्राची ही आहेत वैशिष्ट्ये

    • विद्यमान आकाश प्रणालीच्या तुलनेत, आकाश प्राइमची अचूकता अधिक आहे. कारण यात सुधारित सक्रिय रेडिओ-फ्रिक्वेंसी (आरएफ) यंत्र समाविष्ट करण्यात आले आहे.
    • आभाळात अधिक उंचीवरच्या कमी तापमानातही आकाश प्राइमला अधिक अचूक कामगिरी करण्यासाठी आवश्यक तंत्राने समृद्ध आहे.
    • आकाश प्राईम सिस्टीममुळे भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाचा आत्मविश्वासात प्रचंड वाढ होणार आहे. कारण आकाश प्रणाली या आधीच शस्त्रास्त्रांच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली होती. मात्र आता त्याला अधिक प्राणघातक आणि सुधारीत क्षेपणास्त्रांची जोड मिळाली आहे.
    • आकाश प्राइम ही मध्यम श्रेणीची मोबाईल पृष्ठभागावरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र (SAM) प्रणाली आहे. ही प्रणाली डीआरडीओने विकसित केली असून त्याचे उत्पादन भारत डायनॅमिक्स लिमिटेडने केले आहे.
    • ही क्षेपणास्त्रे टाकी किंवा चाक असलेल्या ट्रकमधूनही सोडली जाऊ शकतात. त्यामुळे भारत-चीन सीमेवरील दुर्गम भागातही त्यांचा वापर प्रभावीपणे करता येणार आहे.

    The modified ground system of the existing ‘Akash’ weapon system successfully completed its trial. Its new threatening weapon in the armory of India.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची