• Download App
    जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करायला गेलेल्या आमदाराला एसपीची कपडे फाटेपर्यंत मारहाण, रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्या आमदाराचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल|The MLA who went to the Collector to lodge a complaint was beaten up till the SP's clothes were torn., Video goes viral on social media

    भाजप आमदाराला एसपीची उत्तर प्रदेशात कपडे फाटेपर्यंत मारहाण… व्हिडीओ व्हायरल

    जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करायला गेल्यावर एसपीने कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचा आरोप उत्तर प्रदेशातील आमदाराने केला आहे. आपला फाटलेला टीशर्ट दाखवित हा आमदार रस्त्यावर झोपल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.The MLA who went to the Collector to lodge a complaint was beaten up till the SP’s clothes were torn., Video goes viral on social media


    विशेष प्रतिनिधी 

    प्रतापगड: जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करायला गेल्यावर एसपीने कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचा आरोप उत्तर प्रदेशातील आमदाराने केला आहे. आपला फाटलेला टीशर्ट दाखवित हा आमदार रस्त्यावर झोपल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

    उत्तर प्रदेशमधील प्रतापगड जिल्ह्यातील भाजपाचे आमदार धीरज ओझा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांनी (एसपी) त्यांना कार्यालयात मारहाण केल्याचा आरोप ओझा यांनी केला आहे.



    आपला फाटलेला कुर्ताही ते दाखवत आहेत. या प्रकारामुळे चिडलेले आमदार रस्त्यावर गोंधळ घालताना दिसत आहेत आणि आजूबाजूला लोकांची गर्दी दिसून येत आहे.

    धीरज ओझा प्रतापगड जिल्ह्यातील राणीगंज येथील भाजपाचे आमदार आहेत. आमदार गोंधळ घालत असताना शेजारी पोलीसही आहे. त्यांच्यावर ते ओरडताना दिसत आहे.

    मतदार यादीमध्ये नाव जोडण्यासाठी भाजपाचे आमदार प्रतापगड जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर आंदोलन करत होते. यावेळी निवासस्थानाजवळ जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित होते. यावेळी एसपींनी आपल्याला मारहाण केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    The MLA who went to the Collector to lodge a complaint was beaten up till the SP’s clothes were torn., Video goes viral on social media

     

    Related posts

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट

    Virat Kohli : विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट