• Download App
    रेल्वे मंत्रालयाचा प्रवाशांना दिलासा, कोरोनामुळे बंद गाड्या पुन्हा नियमितपणे धावणार|The Ministry of Railways has given relief to the passengers, closed trains to run regularly again

    रेल्वे मंत्रालयाचा प्रवाशांना दिलासा, कोरोनामुळे बंद गाड्या पुन्हा नियमितपणे धावणार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: कोरोना संसर्गामुळे रेल्वेने बंद केलेल्या गाड्या आता पुन्हा नियमितपणे धावणार आहेत. त्याचबरोबर या रेल्वे गाड्यांसाठी विशेष गाडीचे भाडेही प्रवाशांना द्यावे लागणार नाही, असा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.The Ministry of Railways has given relief to the passengers, closed trains to run regularly again

    करोना संसर्ग पाहत रेल्वे मंत्रालयाने नियमित मेल आणि एक्स्प्रेस ट्रेन्स या विशेष गाड्या म्हणून चालवल्या होत्या. मात्र आता या ट्रेन्सच्या वाहतूक पुन्हा सामान्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेल/एक्स्प्रेस स्पेशल आणि हॉलिडे स्पेशल ट्रेनची सेवा आता नेहमीच्या गाड्यांसारखी होणार आहे. या गाड्या पुन्हा नियमित क्रमांकाने धावतील.



    यामुळे विशेष ट्रेनचे भाडेही आता प्रवाशांना द्यावे लागणार नाही. आता या ट्रेनसाठी प्रवाशांना जुने नियमित भाडे लागू होणार आहे. सध्या स्पेशल ट्रेनमध्ये नेहमीपेक्षा ३० टक्के जास्त भाडे आकारले जात होते.
    रेल्वे मंत्रालयाने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. येत्या काही दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.

    यासंदर्भात निर्देश जारी करण्यात आले आहेत, असे मंत्रालयाने पत्रकात म्हटले आहे. या निर्णयानंतर येत्या काही दिवसांत १७०० हून अधिक गाड्या नियमित गाड्यांप्रमाणे पूर्ववत केल्या जातील. करोनाशी संबंधित खबरदारी आणि निर्बंध सर्व गाड्यांमध्येही लागू असतील असेही सांगण्यात आले आहे.

    The Ministry of Railways has given relief to the passengers, closed trains to run regularly again

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये