• Download App
    |The Maoists, who had a bounty of Rs 40 lakh, were caught by the Chinese virus

    ४० लाखांचे बक्षीस असलेल्या माओवाद्याला चीनी विषाणूने गाठले

    जंगलात लपून निरपराध भारतीयांवर हल्ले करणाऱ्या माओवाद्यांनाही कोरोना विषाणूने गाठले आहे. अशावेळी औषधे, उपचारांसाठी अनेकांनी वेळीच शरणागती पत्करून उपचार घेतले आणि कोरोनातून मुक्त झाले. मात्र अशी शरणागती न पत्करता आडमुठेपणा करणाऱ्या माओवाद्यांचा जंगलातच मृत्यू होऊ लागला आहे. तब्बल चाळीस लाख रुपयांचे इनाम डोक्यावर असणाऱ्या माओवाद्याच्या बाबतीत नुकताच हा प्रकार घडला.The Maoists, who had a bounty of Rs 40 lakh, were caught by the Chinese virus


    विशेष प्रतिनिधी

    रायपूर : शिरावर ४० लाख रुपयांचे बक्षीस असलेला माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य हरिभूषण ऊर्फ यापा नारायणला चिनी विषाणूने गाठल्याने त्याचा मृत्यू झाला. छत्तीसगढच्या बस्तर भागातील पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

    तेलंगणा राज्य समितीचाही सदस्य असलेला हरिभूषण २१ जून रोजी कोरोना साथीच्या संसर्गाने मृत्यू पावल्याचे सांगण्यात आले. हरिभूषण व्यतिरीक्त अनेक माओवादी अतिरेक्यांना कोरोनाने गाठले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हरिभूषण हा लक्मू दादा या नावानेही ओळखला जातो.



    त्याच्यावर छत्तीसगढमध्ये २२ पेक्षा जास्त गंभीर गुन्हे आहेत. जगन व दुर्योधन या नावानेही हरिभूषण ओळखला जातो.हरिभूषणप्रमाणेच डिसेंबर २०१९ मध्येही केंद्रीय समितीचा सदस्य व दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सचिन रमण्णा याचाही दक्षिण बस्तरमध्ये कोरोनामुळेच मृत्यू झाला होता. अलिकडेच गेल्या काही आठवड्यात गंगा व शोभरोई या नक्षलवाद्यानांही कोरोनाने गाठल्याने त्यांचा मृत्यू झाला.

    पोलिसांनी सांगितले की, जंगलातल्या अंतर्गत भागांमध्ये असलेल्या नक्षलवाद्यांच्या ठिकाणांवर कोरोना संसर्ग पोहोचला आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांची स्थिती चिंताजनक आहे. गेल्या काही महिन्यांत १६ नक्षल्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अनेक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

    नक्षलवाद्यांमध्ये पसरलेली कोरोनाची तीव्र लाट लक्षात घेता ग्रामीण भागातील लोकांना नक्षलवाद्यांपासून आणि त्यांच्या तळांपासून दूर राहण्याचे आवाहन पोलिसांनी केली आहे. परिणामी ग्रामीण, जंगली भागातून नक्षलवाद्यांना मिळणारी मदतही कमी झाली आहे. दरम्यान कोरोना संसर्गग्रस्त नक्षलवाद्यांनीही शरणागती पत्करून वैद्यकीय सोयीसुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

    The Maoists, who had a bounty of Rs 40 lakh, were caught by the Chinese virus

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!