प्रतिनिधी
मुंबई : ब्रिटनमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची पूजेची ऐतिहासिक जगदंबा तलवार महाराष्ट्रात परत आणण्याचे प्रयत्न शिंदे – फडणवीस सरकार करत आहे. या विषयावर ब्रिटन सरकारशी पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. The Maharashtra government will bring back the Jagdamba sword of Chhatrapati Shivaji Maharaj from England
छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ही इतिहासाची साक्षीदार आहे. सध्या ही तलवार ब्रिटनमध्ये आहे. ही तलवार परत भारतात आणण्यासाठी शिंदे – फडणवीस सरकार विशेष प्रयत्न करत आहे. शिवराज्यभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याआधी ही तलवार महाराष्ट्रात परत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
ब्रिटनचे नव निर्वाचित भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार भारताला परत देण्याबाबत महाराष्ट्र सरकार विनंती करणार आहे. इंग्रज ही तलावर घेऊन गेले होते. जगातील सर्व संपत्ती पेक्षा ही तलावर अमूल्य असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
ही तलावर ब्रिटनमधून परत आणण्यासाठी सांस्कृतिक विभाग पत्रव्यवहार करणार आहे. 2024 मध्ये शिवराज्यभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होणार आहेत. यानिमित्ताने महाराष्ट्रात विशेष कार्यक्रमक आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमात ही तलवार ठेवली जाईल. यामुळे ही तलवार परत मिळाल्यास आनंद द्विगुणीत होईल असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
सोन्याच्या फुलांचे नक्षीकाम आणि मोठे हिरे, माणिक या तलवारीला जडविले आहेत.
जगदंबा तलवार जुनी युरोपियन एकपाती, सरळ तलावर आहे. या तलवारीच्या दोन्ही बाजूला दोन खोबणी असून एकामध्ये IHS असं तीन वेळा कोरलंय. तलवारीची मूठ लोखंडी असून त्याला गोलाकार परज आहे. मुठीजवळ सोन्याच्या फुलांचं नक्षीकाम, मोठे हिरे आणि माणिक जडविले आहेत. ही तलवार मराठ्यांचे प्रमुख शिवाजी यांची निशाणी आहे, असा उल्लेखही करण्यात आला आहे.
मराठी अस्मितेचा मानबिंदू असलेली शिवरायांची जगदंबा तलवार
जगदंबा तलवार देशात परत आणण्यासाठी अनेक प्रयत्नही झाले होते. मात्र त्याला यश येऊ शकले नाही. 150 वर्षांच्या राजवटीत ब्रिटिशांनी भारतातल्या अनेक ऐतिहासिक वस्तू इंग्लंडला नेल्या. यातल्या काही भेट म्हणून दिल्या गेल्या होत्या तर काही चक्क लुटून नेल्या होत्या. यातली सर्वात अनमोल आहे ती मराठी अस्मितेचा मानबिंदू असलेल्या शिवरायांची जगदंबा तलवार.
अनेक ऐतिहासिक वस्तू मिळवल्या परत
केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर भारताची धरोहर असणाऱ्या अनेक मौल्यवान वस्तू भारताने विविध देशांची पत्रव्यवहार करून आणि वाटाघाटी करून परत भारतात आणल्या आहेत. यामध्ये अनेक मौल्यवान मूर्ती तसेच अन्य ऐतिहासिक दस्तऐवज आणि वस्तूंचा समावेश आहे.
The Maharashtra government will bring back the Jagdamba sword of Chhatrapati Shivaji Maharaj from England
महत्वाच्या बातम्या
- संजय राऊतांचा खालचा सूर; ईडी विरुद्ध कोणतीही तक्रार नाही; ठाकरे पवारांबरोबरच फडणवीस + मोदी + शाहांनाही भेटणार
- हिंदू शब्दाचा अर्थ घाणेरडा म्हणणाऱ्या कर्नाटक काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षांनी अखेर मागितली माफी; पण…
- गुजरातमधील सिंह नोव्हेंबर अखेरीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार; सुधीर मुनगंटीवारांच्या प्रयत्नांना यश