• Download App
    हातरस चेंगराचेंगरीच्या घटनेतील मुख्य आरोपी मधुकरचा ठिकाणा सापडला!|The location of Madhukar the main accused in the Hathras stampede incident has been found

    हातरस चेंगराचेंगरीच्या घटनेतील मुख्य आरोपी मधुकरचा ठिकाणा सापडला!

    पोलिसांनी माहिती देणाऱ्यास एक लाखाचं बक्षीस केलं होतं जाहीर; बाबाच्या वकिलाने खुलासा केला


    विशेष प्रतिनिधी

    उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सिकंदरराव येथे भोले बाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 121 जणांना जीव गमवावा लागला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. देवप्रकाश मधुकर हा त्यातील मुख्य आरोपी आहे. तो अद्याप फरार आहे. यावर पोलिसांनी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.The location of Madhukar the main accused in the Hathras stampede incident has been found



    दुसरीकडे, साकार हरी यांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे वकील एपी सिंह यांची नियुक्ती केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात वकिलाने सांगितले की, मला एफआयआरची प्रत मिळाली आहे. माझा तपास यंत्रणांवर पूर्ण विश्वास आहे. मुख्य आरोपी रुग्णालयात दाखल आहे. ते म्हणाले की, मधुकर हा हृदयरोगी आहे. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याचाही या घटनेत मृत्यू झाला आहे.

    मधुकर रुग्णालयात दाखल असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होताच आम्ही त्याला पोलिस आणि एसआयटीसमोर हजर करू. पुढील कार्यवाहीसाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. मधुकर यांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचे सांगितले. आम्ही कोणतीही न्यायालयीन कार्यवाही सुरू करणार नाही आणि काही करणार नाहीत.

    The location of Madhukar the main accused in the Hathras stampede incident has been found

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Fatah-2′ missile : चीनने पाकिस्तानला दिलेले ‘फतह-२’ क्षेपणास्त्र भारताने पाडले

    Indian Army : भारतीय लष्कराने जारी केला एक व्हिडिओ अन् पाकिस्तानच्या खोटेपणचा बुरखा फाटला

    Operation sindoor : अणुबॉम्ब टाकायचाय की युद्ध नकोय??, पाकिस्तानातल्या नेत्यांमध्येच गोंधळ; त्यात विमानतळ आणि लष्करी तळांच्या नुकसानीची भर!!