- रत्नागिरी जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील आहे ही घटना
विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील एका गावात एक बिबट्या एका पाळीव मांजराची शिकार करण्यसाठी तिचा पाठलाग करत होता, तर जीव वाचण्यासाठी मांजर सैरावैरा धावत सुटली होती आणि लपण्यासाठी जागा शोधत होती. तेवढ्यात तिने समोर आलेल्या विहीरीत उडी मारली, तर तिच्या पाठोपाठ बिबट्यानेही तिला पकडण्यासाठी विहीरीत झेप घेतली.The leopard and the cat were in the same well for six hours know what really happened
जेव्हा हे दोघेही २० फूट विहीरीत पडले, तेव्हा कदाचित त्यांना त्यांच्या कृतीची जाणीव झाली. कारण, आतापर्यंत पळापळ करत असलेले हे दोन्ही प्राणी त्या विहीरीतील पाण्यात बुडून स्वत:चा जीव वाचवण्यासाठी एकमेकांसमोरच तब्बल सहातास विहीरीच्या भिंतीला धरून बसलेले होते. जणू काही त्यांच्यातील शत्रूत्व संपलं होतं. विहीरीत अवघ्या दोन फूट खोल पाण्याने त्यांना विभक्त केलं होतं. दोन्ही प्राणी आपल्या जीवासाठी विहीरीच्या आतील भिंतीला धरून बसले होते.
मंगळवारी गुहागरमधील नरवन गावच्या स्थानिक लोकांच्या मदतीने वन अधिकाऱ्यांनी सहा तासांपेक्षा अधिक कालवधीनंतर त्या दोघांची विहीरीतून बाहेर काढत सुटका केली. उपेंद्र नाटुसकर यांच्या मालकीच्या विहीरीतून बिबट्याला बाहेर काढण्यासाठी मोठा पिंजरा विहीरीत सोडला गेला होता. त्यानंतर मग गावकऱ्यांनी मांजरीलाही सुखरुप बाहेर काढलं. अशाप्रकारे हे दोन्ही प्राणी जणू काही त्यांची गोष्ट सांगण्यासाठीच जिवंत विहीरीच्या बाहेर आल्याचे जाणवले.
यानंतर वन अधिकाऱ्याने सांगितले, शिकाराचा पाठलाग करताना विहीरीत पडलेल्या जंगली प्राण्यांची सुटका करताना, अनेक रंजक गोष्टी घडतात. आतापर्यंतच्या घटनांवरून असं दिसून आलं आहे की, जंगली प्राणी विहीरीत पडल्यानंतर अशा अस्थेत त्याच्या शिकारावर हल्ला करत नाहीत. या अगोदर एक कुत्रा आणि बिबट्याला सुद्धा जिवंत विहीतून बाहेर काढले गेले होते. या घटननंतर बिबट्याला जंगलात सोडले गेले तर मांजर त्याच्या मालकाकडे परत गेले. अशाप्रकारे या मांजर आणि बिबट्याच्या छोट्याशा घटनेचाही आनंददायी शेवट झाला.
The leopard and the cat were in the same well for six hours know what really happened
महत्वाच्या बातम्या
- मिचाँग चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीवर धडकून उत्तरेकडे सरकले; 100 हून अधिक ट्रेन, 50 उड्डाणे रद्द; चेन्नईत 12 जणांचा मृत्यू
- रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे मुख्यमंत्री; 7 डिसेंबरला शपथविधी, राहुल गांधींनी केले शिक्कामोर्तब
- सनातन धर्माला शिव्या देण्यात मोदी विरोधक दंग; भाजपची पुरती “काँग्रेस” करण्याचा त्यांनी बांधलाय चंग!!
- GOOD News : नवीन वर्षात शेतकऱ्यांची होणार चांदी, बँक खात्यात जमा होणार 5000 रुपये!