• Download App
    शेतकरी आंदोलनात घुसून हिंसाचार घडविणाऱ्या खलिस्तानवाद्यांचा आता थेट कॅनडात जाऊन शोध घेतला जाणार आहे.यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक कॅनडात पोहोचले आहे.|The Khalistanis are now being traced directly from Canada, suspected of participating in the peasant movement

    खलिस्तानवाद्यांचा आता थेट कॅनडात जाऊन शोध, शेतकरी आंदोलनात सहभागाचा संशय

    नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनात घुसून हिंसाचार घडविणाऱ्या खलिस्तानवाद्यांचा आता थेट कॅनडात जाऊन शोध घेतला जाणार आहे.यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक कॅनडात पोहोचले आहे.The Khalistanis are now being traced directly from Canada, suspected of participating in the peasant movement

    शेतकरी आंदोलनादरम्यान दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घडलेल्या हिंसाचाराच्या मागे खलिस्तानचा हात होता, अशी चर्चा होती. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू झाला होता.



    आता सिख फॉर जस्टीस (एसएफजे) सारख्या खलिस्तानच्या निर्माणाचे समर्थन करणाऱ्या फुटीरतावादी संघटनांद्वारे एनजीओच्या फंडींगची चौकशी करत असलेली राष्ट्रीय तपास यंत्रणेची(एनआयए) टीम शुक्रवारी कॅनडामध्ये दाखल झाली आहे.

    एनआयएचे तीन सदस्यीय पथक चार दिवसीय दौऱ्यात या फुटीरतावादी संघटनांच्या परदेशी संस्थांसोबतच्या संबंधांचा तपास करेल. या पथकाचे नेतृत्व आयजी स्तरावरील अधिकारी करत आहे.

    एनआयएच्या रडारावरील संघटनांमध्ये एसएफजे, बब्बर खालसा इंटरनॅशनल, खालिस्तान जिंदाबाद फोर्स आणि खलिस्तान टायगर फोर्सचा समावेश आहे. कॅनडा, यूके, यूएसए, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि जर्मनीमधून त्यांच्या परदेशी फंडींगच्या मार्गांचा तपास केला जाईल.

    दिल्लीत आंदोलक शेतकऱ्यांना भडकवण्यासाठी एसएफजेने प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा फडवणाऱ्यासाठी अडीच लाख रुपये अमेरिकन डॉलरची घोषणा केली होती.

    एसएफजेचा दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूने एका व्हिडिओत शेतकऱ्यांच्या विरोधास १९८४ च्या शीख विरोधी दंगलीशी जोडण्याचा प्रयत्नह केला होता.कॅनडात अनेक खलिस्तानी समर्थक असल्याचे मानले जाते.शेतकरी आंदोलनाच्या काळात याठिकाणी मोर्चे काढून पाठिंबा देण्यात आला होता.

    The Khalistanis are now being traced directly from Canada, suspected of participating in the peasant movement

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य