• Download App
    उत्तर प्रदेशच्या सत्तेची चावी ओबीसींच्या हातात, सगळ्याच पक्षांकडून ओबीसींना चुचकारण्याचा प्रयत्नThe key to power in Uttar Pradesh is in the hands of OBCs, all parties try to seduce OBCs

    उत्तर प्रदेशच्या सत्तेची चावी ओबीसींच्या हातात, सगळ्याच पक्षांकडून ओबीसींना चुचकारण्याचा प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी

    उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या राजकारणात ओबीसी मतांना कधी नव्हे तेवढे महत्व आले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राष्टÑीय लोकदलाशी युती करून आपल्या मुस्लिम-यादव मतदारपेढीसोबत जाट समाजाला जोडण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी करा किंवा मरा अशी अवस्था असल्याने पहिल्यांदाच इतर ओबीसी पक्षांशीही आघाडी केली आहे. भाजपने आपला परंपरागत ओबीसी मतदार कायम ठेवण्यासाठी जास्तीत जास्त ओबीसी उमेदवार रिंगणात उतरविले आहे.The key to power in Uttar Pradesh is in the hands of OBCs, all parties try to seduce OBCs

    उत्तर प्रदेश मंत्रीमंडळातील स्वामीप्रसाद मौर्य यांच्यासह तीन मंत्री आणि नऊ आमदारांनी भाजप सोडल्यावर खºया अर्थाने ओबीसी हा मुद्दा निवडणुकीत तापू लागला. मौर्य यांनी थेट भाजपवर आरोप करत इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) नाकारत असल्याचा आरोप केला होता. भाजपने आत्तापर्यंतच्या सगळ्याच निवडणुकांत ओबीसींना सोबत ठेवले होते.



    या पार्श्वभूमीवर आणखी सावध होत ओबीसी नाराज होणार नाहीत याची काळजी घेतली आहे. भाजपने ओबीसी नेते स्वतंत्रदेव सिंह यांना प्रदेशाध्यक्ष आणि केशव प्रसाद मौर्य यांना उपमुख्यमंत्री केले आहे. कुर्मी समुदायाला आकर्षित करण्यासाठी अपना दल एसच्या अनुप्रिया पटेल आणि निषाद नेते संजय निषाद यांच्या निषाद पक्षाशी युती केली आहे.

    याशिवाय साक्षी महाराज, उमा भारती, निरंजन ज्योती यांच्यासारखे नेते भाजपकडे आहेत. भाजप सरकारने राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशींनुसार ३९ जातिसमुदायांचा ओबीसीमध्ये समावेश करण्याचा विचार केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळातही ओबीसी नेत्यांना सर्वाधिक स्थान देण्यात आलेले आहे. त्यामुळे ओबीसी मतदार नेहमीप्रमाणे भाजपच्याच पारड्यात मत टाकतील असा विश्वास त्यांना वाटत आहे.

    उत्तर प्रदेशच्या एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के ओबीसी आहेत. ७ टक्के यादव, ६ ते ७ टक्के मौर्य, ५ टक्के कुर्मी आणि ५ टक्के निषाद आहेत. याशिवाय दोन टक्के लोधी आणि दोन टक्के जाट समुदाय आहे.१३ टक्के ओबीसीच्या अन्य जाती आहेत. सर्वांत मोठा समुदाय असल्याने सरकार स्थापन करण्यात या समुदायाची महत्त्वपूर्ण भूमिका असते.

    २०१७ मध्येही भाजपने ओबीसींचा पाठिंबा मिळवूनच सत्ता मिळविली होती. त्यावेळी भाजपला ४७, सपाला २९ आणि बसपाला ९ टक्के ओबीसी मते मिळाली होती. भाजपकडून सर्वाधिक १०२ ओबीसी आमदार निवडून आले होते.

    दलीत मतांवर डोळा ठेऊन अखिलेश यादव यांनी ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीशी युती केली आहे. त्याचबरोबर जाटव मते मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने गैरजाटव मते आपल्याकडे खेचण्यासाठी रणनिती आखली आहे. मात्र, या सगळ्यामध्ये ओबीसी मतांकडे दूर्लक्ष होऊ नये असा भाजपचा मुख्य प्रयत्न आहे.

    The key to power in Uttar Pradesh is in the hands of OBCs, all parties try to seduce OBCs

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली