• Download App
    The Kashmir Files : कसला "इस्लामोफोबिया"??; मी स्वत: हिंदुंची हत्या पाहिली आहे, मुस्लिमांनी माफी मागावी; जावेद बेग यांची पोस्ट व्हायरल!! । The Kashmir Files: Whose "Islamophobia" ??; I myself have witnessed the killing of Hindus, Muslims should apologize; Javed Beg's post goes viral !!

    The Kashmir Files : कसला “इस्लामोफोबिया”??; मी स्वत: हिंदुंची हत्या पाहिली आहे, मुस्लिमांनी माफी मागावी; जावेद बेग यांची पोस्ट व्हायरल!!

    प्रतिनिधी

    श्रीनगर : काश्मीर मधले 1990च्या दशकातल्या हिंदूंच्या नरसंहाराचे वास्तव मांडणारा सिनेमा ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबाबत सध्या देशात जोरदार चर्चा सुरु आहे. देशातील एक समूह या चित्रपटातून काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचे सत्य समोर आल्याचं म्हटलं आहे, तर काही जण या चित्रपटाच्या माध्यमातून “इस्लामोफोबियाला” प्रोत्साहन देण्याचाही आरोप करत आहेत. पण या सगळ्यात जावेद बेग नावाच्या काश्मिरी लेखकाने म्हटले आहे की, तो काळ खूप भयावह होता, ज्यात अनेक गुन्हे घडले होते आणि तेही त्याचे साक्षीदार आहेत. त्यामुळे मुस्लिमांनी माफी मागावी, असे आवाहनही बेग यांनी केले आहे. “हिंदुस्थान पोस्ट”ने ही बातमी दिली आहे. The Kashmir Files: Whose “Islamophobia” ??; I myself have witnessed the killing of Hindus, Muslims should apologize; Javed Beg’s post goes viral !!

    पोस्ट होतेय व्हायरल

    जावेद बेग यांनी एक पोस्ट शेअर करत लिहिले की, त्यांच्या पूर्वजांनी ज्या चुका केल्या आहेत, आजच्या तरुणांनी ती चूक मान्य करावी. काश्मिरी पंडितांना मारणारे आमच्याच वस्तीतील आणि आमच्याच घरातील लोक असल्याचे जावेद बेग म्हणाले. तसेच काश्मिरी पंडितही गैरकाश्मिरी नाहीत. काश्मिरी पंडित हे आमचे रक्त आणि आमचाच समाज आहे, असही बेग पुढे म्हणाले.



    तरीही सत्य बदललं जाऊ शकत नाही

    बेग यांनी त्यांच्या विचारांचा एक व्हिडिओ शेअर केला. एका काश्मिरी वृत्तवाहिनीशी बोलतानाचा हा व्हिडीओ आहे. यात त्यांनी काश्मिरी पंडित गिरीजा टिक्कू यांच्या हत्येचा आणि इतर लाखो काश्मिरी पंडितांना जबरदस्तीने स्थलांतरित व्हावे लागले, या दुर्दैवी शोकांतिकेवर त्यांचे मत व्यक्त केले. काश्मिरी मुस्लिमांनी स्वातंत्र्याच्या नावाखाली हातात शस्त्रे घेतली, हा अपप्रचार नसून वास्तव असल्याचेही बेग यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. कोणीही सांगितले नाही, तरी सत्य हे नेहमीच सत्य असते आणि खोटं कितीही ओरडून सांगितलं, तरी ते सत्य होत नसल्याचही त्यांनी स्पष्ट केलंय.

    The Kashmir Files : Whose “Islamophobia” ??; I myself have witnessed the killing of Hindus, Muslims should apologize; Javed Beg’s post goes viral !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के