वृत्तसंस्था
हैदराबाद : एकीकडे “द काश्मीर फाईल्स” या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर 150 कोटींचा आकडा ओलांडला असताना हा सिनेमा मूळात पाहायचाच आहे कुणाला??, या सिनेमामुळे काश्मिरी पंडितांच्या काय फायदा झाला??, असे खोचक सवाल करत तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी “द काश्मीर फाईल्स” सिनेमावर दुगाण्या झोडल्या आहेत.The Kashmir Files: Who wants to watch “The Kashmir Files” ?? What is the benefit of Kashmiri Pandits ?; KCR’s doubles
दिल्लीतले काश्मिरी पंडित उघडपणे बोलतात की तो सिनेमा फक्त व्यावसायिक फायद्यासाठी काढला आहे. त्यातून काश्मिरी पंडितांना कोणताही लाभ झालेला नाही. जर एखादे प्रगतीशील सरकार असते तर “एरीकेशन फाईल्स”, “इकॉनॉमिक फाईल्स” असे सिनेमे आले असते. किंबहुना प्रगतीशील सरकारांनी देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीकडे लक्ष दिले असते, असा खोचक टोला चंद्रशेखर राव यांनी लगावला आहे.
- The Kashmir Files : 150 कोटींचा आकडा, बॉलिवूडच्या “खानावळी पोपटां”चे 360 अंशात वळून मिठू मिठू बोल…!!
पवारांचे टीकास्त्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील “द काश्मीर फाईल्स” या सिनेमावर शंका व्यक्त केली आहे. जुन्या इतिहासात काय घडले हे दाखवून सामाजिक वातावरण कलुषित करू नये, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर केसीआर चंद्रशेखर राव यांनी देखील पवार यांच्या सुरात सूर मिसळत सिनेमावर टीका केली आहे.
150 कोटींचा गल्ला
“द काश्मीर फाईल्स” सिनेमाने बॉक्स ऑफिस वर 150 कोटींचा टप्पा ओलांडला असून तो येत्या आठवडाभरात 200 कोटींचा टप्पाही पार करेल, असे भाकीत सिने क्रिटीक तरण आदर्श यांनी व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर बॉलीवूडचे पोपट देखील बोलू आणि डोलू लागले आहेत…!! आमीर खानने सिनेमाची स्तुती केली आहे. आपण तो सिनेमा लवकरच बघणार असून काश्मिरी जनतेवर झालेले अत्याचार भयानक होते. मानवतेच्या दृष्टिकोनातून याकडे पाहिले पाहिजे. इतिहासात जे घडले ते पुन्हा घडू नये, असे मत आमीर खानने व्यक्त केले आहे.
The Kashmir Files: Who wants to watch “The Kashmir Files” ?? What is the benefit of Kashmiri Pandits ?; KCR’s doubles
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपला मतदान केल्यामुळे पतीने महिलेस घराबाहेर काढले
- The Kashmir Files : 150 कोटींचा आकडा, बॉलिवूडच्या “खानावळी पोपटां”चे 360 अंशात वळून मिठू मिठू बोल…!!
- कुचिक यांच्या मुलीकडून चित्रा वाघ, पिडीत मुलीची नार्को टेस्टची मागणी
- The Kashmir Files : “द काश्मीर फाईल्स”ने ओलांडला 150 कोटींचा आकडा; “बॉलिवूडचे पोपट” बोलू लागले… डोलू लागले!!