वृत्तसंस्था
नवी दिल्ली : “द काश्मीर फाईल्स” या दोन – सव्वा दोन घंट्याच्या सिनेमाने अक्षरश: कमाल केली आहे… भल्या भल्याभल्यांची भंबेरी या सिनेमाने उडवली आहे. आधी राजकीय प्रस्थापित नेते बोलले. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “आग” लावली. त्यानंतर देशात त्या सिनेमाची लाट उसळली. पण सेक्युलरिस्टांच्या बुडाला पुरती आग लागली…!!The Kashmir Files: Sitaram Yechury, the leader of the defunct Marxists, spoke for many days, saying “The Kashmir Files” is creating social divisions !
या आगीत होरपळून निघाल्यानंतर आता अस्तंगत झालेल्या मार्क्सवाद्यांचे नेते सीताराम येचुरी बोलले आहेत. “द काश्मीर फाईल्स” या सिनेमाने असे वातावरण निर्माण केले आहे की त्यामुळे देशात मोठी सामाजिक फूट पडेल आणि देशाला दीर्घकाळ त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे शरसंधान सीताराम येचुरी यांनी सोडले आहे.
मूळात डावे कम्युनिस्ट पक्ष आता भारतात संदर्भहीन झाले आहेत. त्यांचे नेते फार तुरळक ठिकाणी आता दिसतात. सीताराम येचुरी पण बऱ्याच महिन्यांनी बोलले आहेत. ते देखील काश्मीर फाईल्स वर त्यांची प्रतिक्रिया विचारल्यावर बोलले आहेत. ते काय बोलले, या पेक्षा ते बऱ्याच दिवसांनी बोलले हेच विशेष ठरले आहे.
केसीआरच्या दुगाण्या!!
एकीकडे “द काश्मीर फाईल्स” या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर 150 कोटींचा आकडा ओलांडला असताना हा सिनेमा मूळात पाहायचाच आहे कुणाला??, या सिनेमामुळे काश्मिरी पंडितांच्या काय फायदा झाला??, असे खोचक सवाल करत तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी “द काश्मीर फाईल्स” सिनेमावर दुगाण्या झोडल्या आहेत.
दिल्लीतले काश्मिरी पंडित उघडपणे बोलतात की तो सिनेमा फक्त व्यावसायिक फायद्यासाठी काढला आहे. त्यातून काश्मिरी पंडितांना कोणताही लाभ झालेला नाही. जर एखादे प्रगतीशील सरकार असते तर “एरीकेशन फाईल्स”, “इकॉनॉमिक फाईल्स” असे सिनेमे आले असते. किंबहुना प्रगतीशील सरकारांनी देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीकडे लक्ष दिले असते, असा खोचक टोला चंद्रशेखर राव यांनी लगावला आहे.
पवारांचे टीकास्त्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील “द काश्मीर फाईल्स” या सिनेमावर शंका व्यक्त केली आहे. जुन्या इतिहासात काय घडले हे दाखवून सामाजिक वातावरण कलुषित करू नये, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर केसीआर चंद्रशेखर राव यांनी देखील पवार यांच्या सुरात सूर मिसळत सिनेमावर टीका केली आहे.
150 कोटींचा गल्ला
“द काश्मीर फाईल्स” सिनेमाने बॉक्स ऑफिस वर 150 कोटींचा टप्पा ओलांडला असून तो येत्या आठवडाभरात 200 कोटींचा टप्पाही पार करेल, असे भाकीत सिने क्रिटीक तरण आदर्श यांनी व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर बॉलीवूडचे पोपट देखील बोलू आणि डोलू लागले आहेत…!! आमीर खानने सिनेमाची स्तुती केली आहे. आपण तो सिनेमा लवकरच बघणार असून काश्मिरी जनतेवर झालेले अत्याचार भयानक होते. मानवतेच्या दृष्टिकोनातून याकडे पाहिले पाहिजे. इतिहासात जे घडले ते पुन्हा घडू नये, असे मत आमीर खानने व्यक्त केले आहे.
The Kashmir Files: Sitaram Yechury, the leader of the defunct Marxists, spoke for many days, saying “The Kashmir Files” is creating social divisions !
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेना नेत्यांशी संपर्क साधूनही बेदखल केल्याचा पीडित तरुणीचा आरोप
- The Kashmir Files : “द काश्मीर फाईल्स” पाहायचा कुणाला?? काश्मिरी पंडितांनी फायदा काय?; केसीआरच्या दुगाण्या!!
- भाजपला मतदान केल्यामुळे पतीने महिलेस घराबाहेर काढले
- The Kashmir Files : 150 कोटींचा आकडा, बॉलिवूडच्या “खानावळी पोपटां”चे 360 अंशात वळून मिठू मिठू बोल…!!