• Download App
    The Kashmir Files : सज्जाद लोन यांचे परस्परविरोधी बोल; म्हणाले, काश्मीर फाईल्स काल्पनिक...!!; पल्लवी जोशींचेही कडक प्रत्युत्तर । The Kashmir Files: Sajjad Lone's Contradictory Speech; Said, Kashmir files are fictional ... !!; Strict reply from Pallavi Joshi too

    The Kashmir Files : सज्जाद लोन यांचे परस्परविरोधी बोल; म्हणाले, काश्मीर फाईल्स काल्पनिक…!!; पल्लवी जोशींचेही कडक प्रत्युत्तर

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काश्मीर मधील हिंदूंच्या नरसंहाराचे सत्य मांडणारा सिनेमा “द काश्मीर फाईल्स” बॉक्स ऑफिस वर सुपरहिट होत चालला आहे, तशी त्यावरची टीका देखील तीव्र होत चालली आहे. The Kashmir Files: Sajjad Lone’s Contradictory Speech; Said, Kashmir files are fictional … !!; Strict reply from Pallavi Joshi too

    जम्मू काश्मीर पीपल्स पार्टीचे नेते सज्जाद लोन यांनी “द काश्मीर फाईल्स” या सिनेमावर टीकास्त्र सोडले आहे. पण सज्जाद लोन यांचा बोलात बोल मात्र राहिलेला नाही. एकाच वेळी त्यांनी “द काश्मीर फाईल्स”ची कथा काल्पनिक असल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे त्यांनी काश्मीरमध्ये पंडितांवर अत्याचार झाल्याची कबुलीही दिली आहे.

    सज्जाद लोन यांनी पत्रकार परिषद घेऊन “द काश्मीर फाईल्स”वर शरसंधान साधले आहे. ते म्हणाले, द काश्मीर फाईल सिनेमाची कल कथा काल्पनिक आहे त्यामध्ये सत्यता नाही काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांनी जेवढे हाल भोगले आहे त्याच्यापेक्षा 50 पटींनी काश्मीर मुस्लिमांनी हाल भोगले आहेत. त्यांच्यावर अत्याचार झाले आहेत. परंतु सिनेमामध्ये मात्र एकतर्फीच अत्याचार झालेले दाखवण्यात आले आहेत, असा दावा सज्जाद लोन यांनी केला आहे.



    – पल्लवी जोशींचे प्रत्युत्तर

    “द काश्मिरी फाईल्स” ही कथा काल्पनिक असल्याच्या आरोपांना अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विवेक अग्निहोत्रीने सिनेमा बनवण्यापूर्वी शेकडो लोकांच्या भेटी घेऊन त्यांच्या मुलाखती रेकॉर्ड केले आहेत प्रत्यक्ष काश्मीर मध्ये जाऊन घटना स्थळांना भेटी दिल्या आहेत. या सगळ्या पुराव्यांचे 4000 तासांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे “द काश्मीर फाईल्स” सिनेमा काल्पनिक आहे हे म्हणणेच मुळात चूक आहे, असे प्रत्युत्तर पल्लवी जोशी यांनी दिले आहे.

    The Kashmir Files : Sajjad Lone’s Contradictory Speech; Said, Kashmir files are fictional … !!; Strict reply from Pallavi Joshi too

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची