प्रतिनिधी
नवी दिल्ली : काश्मीर मधल्या हिंदूंच्या भयानक शिरकाणावर तयार करण्यात आलेला सिनेमा “द काश्मीर फाइल्स” हा देशात आणि परदेशात जबरदस्त हिट झाला असताना या मुद्द्यावरून धर्मांध मुस्लिम, लिबरल जमात आणि काँग्रेस प्रचंड अस्वस्थ झाले आहेत.The Kashmir Files kerala congress tweeet
– केरळ काँग्रेसचे ट्विट
यातूनच केरळ काँग्रेसने काल काश्मीर मध्ये 399 हिंदू मेले आणि 15 हजार मुसलमान मेले, असे गलिच्छ भाषेतली ट्विट केले होते. जेव्हा सगळीकडून काँग्रेस जोरदार ट्रोल झाली. तेव्हा संबंधित ट्विट डिलिट करून तासाभरापूर्वी केरळ काँग्रेसने नवीन ट्विट केले आहे. यामध्ये केरळ काँग्रेसने आपली “विशिष्ट” मखलाशी सादर केली आहे. भारताचा धर्मनिरपेक्षत ढाचा टिकून राहिला पाहिजे. आम्ही काश्मिरी पंडितांचा देखील तितकाच सन्मान करतो. प्रत्येक भारतीयाचा सन्मान करतो, असे केरळ काँग्रेसने नव्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
– जुने ट्विट
यापूर्वीच्या ट्विटमध्ये “द काश्मीर फाईल्स” सिनेमा वरून सुरू झालेल्या वादात उडी घेऊन केरळ काँग्रेसने 1990 ते 2007 या कालावधीत काश्मीर मध्ये हिंसाचारात 399 काश्मिरी पंडित मेले, पण 15000 मुसलमानही मारले गेले असे तुलनात्मक ट्विट केले होते.
– काँग्रेसवर टीकेची झोड
त्यावरून सोशल मीडियामध्ये काँग्रेसवर जोरदार टीकेची झोड उठविण्यात आली होती. यानंतर केरळ काँग्रेसला उपरती होऊन यांनी संबंधित ट्विट डिलिट केले. मात्र ते डिलीट करताना नव्या मखलाशीत आपल्या तथाकथित धर्मनिरपेक्षतेचे ढोल बडवून घेतले. भारता मधले शांतता आणि सौहार्द बिघडता कामा नये असा सूरही केरळ काँग्रेसने नवीन ट्विट मधून लावला आहे. पण एकूण “द काश्मीर फाइल्स” या सिनेमाला भारतात आणि परदेशात मिळत असलेला प्रतिसाद पाहून धर्मांध मुस्लिमांनी “लव्ह जिहाद” सारखाच “फिल्म जिहाद” पुकारला आहे, तर जमियत ए लिबरल अंडरग्राउंड होऊन फिल्म जिहादला सपोर्ट करताना दिसत आहे. काँग्रेसला मात्र सोशल मीडियावर सपाटून मार खाल्ल्यानंतर आपले हिंदुविरोधी ट्विट मागे घ्यावे लागले आहे.