• Download App
    द काश्मीर फाईल्स ऑस्करच्या शर्यतीत; पाच भारतीय चित्रपटांपैकी एक!! The Kashmir Files in Oscar Race; One of the five Indian movies!!

    द काश्मीर फाईल्स ऑस्करच्या शर्यतीत; पाच भारतीय चित्रपटांपैकी एक!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचे सत्य मांडणारा सिनेमा द काश्मीर फाईल्स ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत पोहोचला आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला अकॅडमी अवॉर्ड्स कमिटीने प्रतिष्ठित ऑस्कर 2023 पुरस्कारासाठी शाॅर्टलिस्ट केले आहे.The Kashmir Files in Oscar Race; One of the five Indian movies!!

    खुद्द विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करत ही आनंदाची बातमी दिली आहे. भारतातून ऑस्करसाठी पाठवलेल्या पाच चित्रपटांपैकी हा एक आहे. या चित्रपटाच्या टीमशी निगडीत प्रत्येक व्यक्तीचे अग्निहोत्रींनी आभार मानले. इतकेच नाही तर द कश्मीर फाईल्सचे कलाकार पल्लवी जोशी, मिथून चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि अनुपम खेर यांनासुद्धा सर्वोत्कृष्ट कलाकारांच्या यादीत शाॅर्टलिस्ट केले आहे.

    ही तर फक्त सुरुवात : विवेक अग्निहोत्री

    ही तर फक्त सुरवात आहे. अजून खूप पुढे जायचे आहे, अशा शब्दांत अग्निहोत्रींनी आनंद व्यक्त केला. द कश्मीर फाईल्स हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटावरुन मोठा वादसुद्धा निर्माण झाला होता. द कश्मीर फाईल्स हा प्रचारकी चित्रपट असल्याची टीका झाली. या चित्रपटात 1990 मध्ये कश्मिरच्या खो-यात कश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची सत्यकथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटावरुन वाद झाला असला तरी बाॅक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठी कमाई केली होती.

    The Kashmir Files in Oscar Race; One of the five Indian movies!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते