प्रतिनिधी
मुंबई : सध्या गाजत असलेले सुपर हिट सिनेमे “पावनखिंड” झुंड आणि “द काश्मीर फाईल्स” यांच्यात विशिष्ट हेतूंनी झुंज लावणार्यांवर दिग्दर्शक विजू माने यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट मधून जोरदार प्रहार केला आहे. त्यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवर एक कविता सादर केली असून त्यामध्ये जातीचा द्वेष पसरवणाऱ्याःवर खोचक शब्दांमध्ये शरसंधान केले आहे. The Kashmir Files and pawan khind, jhund
– सगळे आदर्श “वाटून” टाक
“संविधान”, “राजे”, “स्वातंत्र्यवीर” सगळे आदर्श “वाटून” टाक!! जातीच्या विद्वेषाच्या तलवारीचा मेंदूवर थेट वार!!, अशा आशयाची ही कविता आहे. ती विजू माने यांनी सादर केली आहे. त्याचबरोबर आपण समाज म्हणून नेमके काय करतो आहोत? कोणताही सिनेमा आपण फक्त जातीय विद्वेष पसरवण्यासाठी बघतो का?, असा परखड सवाल त्यांनी केला आहे.
– राजकारणाचा चिखल सिनेमा क्षेत्रात
राजकारणाचा तर चिखल झालाच आहे, पण आता सिनेमाच्या क्षेत्रातही हा चिखल ओढून आणला जात आहे, अशी मर्मभेदी टीकाही विजू माने यांनी आपल्या पोस्ट मधून केली आहे.
– वृत्तवाहिन्यांचे ओपिनियन पोल
काही वृत्तवाहिन्यांनी हेतुतः तुम्हाला कोणता चित्रपट पाहायला आवडेल?, “पावनखिंड” “झुंड” की “द काश्मीर फाइल्स” असा ओपिनियन पोल घेतला होता. त्याचबरोबर सोशल मीडियावर विविध संघटनांनी काही कॅम्पेन चालवले आहे. यावरूनच विजू माने यांनी देशात जातीय विद्वेष पसरवण्याचे हे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.
– शिकला सवरलेला मेंदू सडेल
तुमचे आडनाव विचारून तुमची आवड ठरवली जाते, यावर त्यांनी बोट ठेवले आहे. तसेच कवितेच्या अखेरीस फुले-शाहू-आंबेडकर हे मनात रडतील आणि जातीच्या विद्वेषाने शिकला सवरला मेंदूही सडेल, असा गंभीर इशारा विजू माने यांनी आपल्या कवितेतून दिला आहे.
The Kashmir Files and pawan khind, jhund
महत्त्वाच्या बातम्या
- PM Modi on Dynasty : भाजपमध्ये 45 खासदारांची “घराणेशाही”; मोदी खरंच “मोठे ऑपरेशन” करतील…??
- काेटयावधी रुपये कमविण्यासाठी तेजस माेरेचे षडयंत्र; औरंगाबादवरुन आले संशयास्पद घडयाळ
- बीएचआर मधील १२ आराेपींकडून ४९ काेटी जप्त हाेणार पाेलीसांकडून फाॅरेन्सिक ऑडिटचा अहवाल न्यायालयात सादर
- Farmers electricity connections : शेतकऱ्यांच्या वीज तोडणी प्रश्नावर फडणवीस आक्रमक; सरकार झुकले, पण तीन महिन्यांपुरती वीज तोडणार