प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अनेकांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. यामध्ये 2019 मध्ये रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणात ऐतिहासिक निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचाही समावेश आहे.The judge who gave the historic decision to build the Ram temple received an invitation
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, राम मंदिरावर ऐतिहासिक निकाल देणाऱ्या पाच न्यायाधीशांव्यतिरिक्त, माजी सरन्यायाधीश, न्यायाधीश आणि प्रख्यात वकिलांसह न्याय क्षेत्राशी संबंधित 50 हून अधिक व्यक्तींना 22 जानेवारीला आमंत्रित करण्यात आले आहे.
9 नोव्हेंबर 2019 रोजी तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई, माजी सरन्यायाधीश बोबडे, सरन्यायाधीश चंद्रचूड आणि माजी न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर यांचा समावेश असलेल्या पाच सदस्यीय खंडपीठाने राम मंदिर बांधकामाच्या बाजूने निर्णय दिला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आपल्या आदेशात श्री रामजन्मभूमी रामलल्लाच्या पक्षाला दिली होती आणि मशीद बांधण्यासाठी मुस्लीम बाजूस पाच एकर पर्यायी जमीन देण्याचे आदेश सरकारला दिले होते.
The judge who gave the historic decision to build the Ram temple received an invitation
महत्वाच्या बातम्या
- दावोसमध्ये 3.53 लाख कोटींचे विक्रमी गुंतवणूक करार करून मुख्यमंत्री महाराष्ट्रात परत!!
- वडोदराच्या हरणी तलावात बोट उलटल्याने २५ पेक्षा अधिक विद्यार्थी बुडाले!
- अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आलेल्या रामभक्तांना अल्पसंख्याक मोर्चा मोफत चहा देणार!
- राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी!