• Download App
    जुनैद मोहम्मदची जिहादी करामत; १० मुलांना दहशतवादी संघटनेत केले भरतीThe jihadi tricks of Junaid Mohammed; 10 children recruited in terrorist organization

    जुनैद मोहम्मदची जिहादी करामत; १० मुलांना दहशतवादी संघटनेत केले भरती

    वृत्तसंस्था

    पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘लष्कर ए तोयबा’ या अतिरेकी संघटनेच्या संपर्कात असलेल्या एका संशयित तरुणाला पुणे दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती. जुनैद मोहम्मद असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. अतिरेकी संघटनांना अर्थपुरवठा करण्याच्या आरोपाखाली जुनैदवर कारवाई करण्यात आली आहे. The jihadi tricks of Junaid Mohammed; 10 children recruited in terrorist organization

    दापोडी परिसरातून जुनैदला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात मंगळवारी, २४ मे रोजी हजर करण्याल आले. त्यानंतर जुनैदला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. जुनैदच्या चौकशीत त्याने १० जणांना दहशतवादी संघटनेत भरती केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

    जुनैदच्या चौकशीतून उघड झाली

    जुनैद मोहम्मद याने महाराष्ट्र, झारखंड, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातील तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी प्रोत्साहित केल्याचे तपास यंत्रणांच्या चौकशीतून समोर आले आहे. तसेच जुनैदने जम्मू-काश्मीरमध्ये काही जणांना दहशतवादी संघटनेत सहभागी केले होते. त्यानंतर ही मुले लष्करी कारवाईत मारली गेली, अशी धक्कादायक माहितीही जुनैदच्या चौकशीतून उघड झाली आहे.

    जुनैदने १० जणांना दहशतवादी संघटनेत भरती केले. ATS च्या सूत्रांची ही माहिती आहे. १० जणांपैकी काही जण मारले गेले, काही जणांना अटक झाली. जुनैदला पुणे ATS ने ताब्यात घेतले आहे, सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

    The jihadi tricks of Junaid Mohammed; 10 children recruited in terrorist organization

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    शक्ती संवाद : महिला सक्षमीकरणाच्या बरोबरच भारतीय संघराज्य व्यवस्थेतला सुसंवाद वाढविण्याचाही सक्षम प्रयोग!!

    India and China : भारत-चीन लिपुलेख खिंडीतून पुन्हा व्यापार सुरू करणार; सीमा वादावरून नेपाळचा विरोध

    शरद पवारांचा INDI उमेदवाराला पाठिंबा; पण त्यांचे खासदार मोदींच्या भेटीला; “पवार बुद्धीचे” तिरके राजकारण साधायला!!