विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचा ‘वायुशक्ती 2022’ हा कार्यक्रम हवाई दलाने पुढे ढकलला आहे. पाकिस्तानच्या सीमेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोखरणमध्ये 7 मार्चला हवाई दल शक्तीप्रदर्शन करणार होते.The Indian Air Force has postponed the Vayu Shakti program in Pokhran
हा सराव दर तीन वषार्तून एकदा आयोजित केला जातो, ज्यामध्ये भारतीय हवाई दलाची ताकद दाखवली जाते. त्याचबरोबर देशाचं रक्षण करण्यासाठी आणि शत्रूचा सामना करण्यासाठी हवाई दल पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही देशाला देण्यात येते. मात्र यंदा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार होते.
वायु शक्ती सराव केवळ हवाई दलाचं सामर्थ्यच दाखवत नाही तर हवाई दलासाठी ऑपरेशनल प्रशिक्षणाचा तो महत्वाचा भाग आहे. प्रत्यक्ष युद्धासारखी निर्माण करून आॅपरेशन केलं जातं. वायु शक्ती सरावात एकूण 148 विमानं सहभागी होणार होती.
यामध्ये नल एअरबेसवरून 18, फलोदी एअरबेसवरून 29, जोधपूरहून 46, जैसलमेरहून 30, उत्रलाई येथून 21, आग्रा येथून 2 आणि हिंडन एअरबेसवरून 2 विमाने टेक आॅफ करतील. 109 लढाऊ विमाने, 24 हेलिकॉप्टर, 7 वाहतूक विमानांचाही समावेश होणार होता. मात्र आता हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
The Indian Air Force has postponed the Vayu Shakti program in Pokhran
महत्त्वाच्या बातम्या
- विधानसभा अध्यक्षाबाबत मुख्यमंत्री सल्ला देऊ नये? हायकोर्टाचा भाजप आमदारांना प्रश्न
- Shane Warne : फिरकीच्या जादूगाराची झळाळती कारकीर्द…!!
- २०,००० भारतीय नागरिक युक्रेनमधून भारतात
- Shane Warne : भल्याभल्या फलंदाजांना खेळपट्टीवर नाचवणारा जादुई फिरकीचा धनी…!!