• Download App
    भारतीय कृषी क्षेत्राची निर्यातीतही घौडदौड, जगातील पहिल्या दहा कृषी उत्पन्न निर्यातदार देशांच्या यादीत स्थान|The Indian agricultural sector is also a major exporter, ranking among the world's top ten agricultural exporters

    भारतीय कृषी क्षेत्राची निर्यातीतही घौडदौड, जगातील पहिल्या दहा कृषी उत्पन्न निर्यातदार देशांच्या यादीत स्थान

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय कृषी क्षेत्रानेही निर्यातीच्या क्षेत्रातही मोठी घौडदौड सुरू ठेवली आहे. कृषी उत्पन्न निर्यात करणाऱ्या जगातील पहिल्या दहा देशांत भारताचा समावेश आहे. गेल्या २५ वर्षांतील जागतिक कृषी व्यापाराच्या यादीत भारताने हे स्थान मिळविले आहे.The Indian agricultural sector is also a major exporter, ranking among the world’s top ten agricultural exporters

    जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) गेल्या 25 वषार्तील जागतिक कृषी व्यापाराच्या ट्रेंडविषयी अहवालानुसार, 2019 मध्ये भारत अव्वल 10 कृषी उत्पन्न निर्यातदारांच्या यादीत आला आहे. तांदूळ, कापूस आणि मांस निर्यातीत भारताचा वाटा मोठा आहे.



    २०१९ मध्ये जागतिक व्यापारात भारताची कृषी निर्यात ३.१ टक्के होती. त्यावेळी मेक्सिकोचा वाटा ३.४ टक्के, चीनचा ५.४ टक्के , ब्राझीलचा ७.८ टक्के आणि अमेरिकेचा वाटा १३.८ टक्के आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे १९९५ मध्ये थायलंडचा जागतिक तांदूळ व्यापारातील हिस्सा ३८ टक्के होता.

    त्यावेळी भारताचा हिस्सा २६ टक्के आणि अमेरिकेचा १९ टक्के होता. २०१९ मध्ये भारताने तांदूळ निर्यातीत थायलंडला मागे टाकले आहे. भारताचा जागतिक व्यापारातील तांदूळ निर्यातीचा हिस्सा ३३ टक्के झाला आहे तर थायलंडचा २० टक्यांपर्यंत कमी झाला आहे.

    जगातील कापसाच्या पहिल्या १० निर्यातदारांमध्येही भारताने क्रमांक मिळविला आहे. भारताचा जागतिक व्यापारातील हिस्सा ७.६ टक्के आहे. १९९५ मध्ये पहिल्या दहामध्येही नसताना आता कापूस निर्यातीत भारताचा क्रमांक चौथा आहे. सोयाबीनच्या व्यापारातही भारत नवव्या स्थानावर आहे.’मांस आणि प्राणीजन्य खाद्य तेल प्रकारात जागतिक व्यापारात भारत आठव्या स्थानी असून एकूण हिस्सा ४ टक्के आहे.

    The Indian agricultural sector is also a major exporter, ranking among the world’s top ten agricultural exporters

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी