विशेष प्रतिनिधी
मुंबई : हरियाणा विधानसभा निवडणूक गमावली असली तरी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या जनमताच्या पाठिंब्याच्या बळावर विधानसभा निवडणुकीत आपण महाराष्ट्र काबीज करू. त्यानंतर दिल्लीतले मोदी सरकार हादरवून टाकू, असे मनसूबे महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय पातळीवरची INDI आघाडी यांच्यातल्या नेत्यांनी आखले होते. परंतु, प्रत्यक्षात हरियाणा पाठोपाठ महाराष्ट्र गमवावा लागला. इतकेच नव्हे, तर महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव झाला. त्यामुळे केंद्रातले मोदी सरकार हादरवायला निघालेल्या INDI आघाडीलाच आता मोठे तडे सहन करायची पाळी आली. The INDI alliance
उद्धव ठाकरेंची शिवसेना, ममता बॅनर्जींची तृणमूळ काँग्रेस आणि अरविंद केजरीवालांची आम आदमी पार्टी आता INDI आघाडी पासून फारकत घेत आपली वेगळी वाट चोखाळाच्या मार्गाला लागले आहेत.
INDI आघाडीचा ठाकरेंच्या शिवसेनेला ममतांच्या तृणमूल काँग्रेसला आणि केजरीवालांच्या आम आदमी पार्टीला कुठल्याच निवडणुकीत काहीच उपयोग झाला नाही. पश्चिम बंगाल मध्ये तशाही ममता बॅनर्जी काँग्रेस आणि डाव्या पक्ष्यांची फटकूनच वागत आहेत. आम आदमी पार्टीने दिल्ली आणि पंजाब मध्ये काँग्रेसला डच्चू देत स्वतःचे स्वतंत्र सरकार राखले. दिल्लीची विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी स्वबळावरच लढवणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत जागा वाटपापासून जी भांडणे सुरू झाली. तिचा उत्तरार्ध निकालानंतर पाहायला मिळाला. उद्धव ठाकरेंच्या सगळ्या आमदारांनी स्वबळावर महापालिका निवडणुकीत उतरण्याच्या गोष्टी सुरू केल्या. उद्धव ठाकरेंकडे तसा आग्रह धरला. यात फक्त संजय राऊत एकाकी पडले. कारण त्यांनी महाविकास आघाडीची कास धरली.
अदानींच्या भ्रष्टाचार मुद्द्यावर राहुल गांधींची साथ द्यायला ममता बॅनर्जी नकार दिला. केवळ एका मुद्द्यावर संसदेचे कामकाज बंद पाडू शकत नाही. पश्चिम बंगालला निधी देण्यात केंद्र सरकार हात आखडता घेते. त्या विरोधात आम्हाला संसदेत बोलायचे आहे, असे ममता बॅनर्जींच्या पक्षाच्या खासदारांनी सांगून अदानी मुद्द्यावर संसद बंद पाडायला नकार दिला.