• Download App
    काँग्रेसच्या घराणेशाहीचे प्रादेशिक पक्षांकडून अनुकरण; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेठीतून हल्लाबोल!!The imitation of the Congress dynasty by the regional parties

    UP elections : काँग्रेसच्या घराणेशाहीचे प्रादेशिक पक्षांकडून अनुकरण; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेठीतून हल्लाबोल!!

    वृत्तसंस्था

    अमेठी : देशातल्या प्रादेशिक पक्षांचे सगळे नेतृत्व हे काँग्रेस कडूनच घराणेशाही शिकले. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने पहिली घराणेशाही आणली आणि त्याचेच अनुकरण नंतर प्रादेशिक पक्षांनी केले, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील अमेठीतून केली आहे.The imitation of the Congress dynasty by the regional parties

    अमेठी हा पूर्वी राहुल गांधी यांचा मतदारसंघ होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव करून ही जागा भाजपच्या ताब्यात आणली. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत अमेठीत पंतप्रधान मोदींची सभा झाली त्यावेळी त्यांनी काँग्रेससह प्रादेशिक पक्षांच्या घराणेशाहीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. याला राजकीय दृष्ट्या विशेष महत्त्व आहे.

    पंतप्रधान मोदी म्हणाले, की स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसमध्ये घराणेशाहीचा प्रश्न आला नाही. परंतु, स्वातंत्र्यानंतर काँग्रेसवर एका घराण्याने कब्जा केला. ते वर्षानुवर्षे सत्तेवर राहिले. त्यामुळे त्यांचेच अनुकरण देशातल्या प्रादेशिक पक्षांनी केले. प्रादेशिक पक्षांचे सुरुवातीचे नेतृत्व हे काँग्रेसविरोधातूनच पुढे आले होते. पण नंतर या प्रादेशिक पक्षांच्या नेतृत्वाने आपल्याच घराण्यातल्या लोकांकडे पक्षांचे नेतृत्व सोपवले. संपूर्ण देशातल्या लोकशाहीला या घराणेशाहीची वाळवी लागली आहे, असे टीकास्त्र पंतप्रधान मोदींनी सोडले.

    अहमदाबाद बाँबस्फोटाटातील 38 आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. परंतु, न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत काँग्रेसने किंवा प्रादेशिक पक्षांनी केले नाही. कारण त्यांना स्वतःच्या अल्पसंख्यांक वोटबँकेची चिंता आहे. देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आणि दहशतवादी हल्ल्यात भारतीय नागरिक मारले गेले याची चिंता काँग्रेस किंवा प्रादेशिक पक्षांना नाही. फक्त वोटबँकेची चिंता ते करत आहेत, अशा तिखट शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी हल्लाबोल केला.

    The imitation of the Congress dynasty by the regional parties

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Masood Azhar : युद्धबंदीचे उल्लंघन झाल्यास योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार सैन्यदलास देण्यात आले आहेत.

    व्यापाराचे हत्यार वापरून अमेरिकेनेच भारत – पाकिस्तानचे अणुयुद्ध थांबविले, अन्यथा लाखो लोक मेले असते; मोदींच्या भाषणाआधी डोनाल्ड ट्रम्प यांचे निवेदन!!

    EOS-09 satellite : भारतीय सैन्याला मोठी ताकद मिळणार, इस्रो EOS-09 उपग्रह प्रक्षेपित करणार