पोखरण पुन्हा एकदा भारताची आत्मनिर्भरता, आत्मविश्वास आणि स्वाभिमान या त्रिमूर्तीचे साक्षीदार बनले आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, येत्या काही वर्षांत जेव्हा आपण जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनू, तेव्हा भारताचे लष्करी सामर्थ्यही नवीन उंची गाठेल आणि भारताला तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्यात राजस्थान मोठी भूमिका बजावणार आहे. विकसित राजस्थान विकसित सैन्यालाही तितकेच सामर्थ्य देईल.The idea of a developed India is not possible without a self reliant India Modi
याशिवाय मोदी म्हणाले, आज आपण पाहिलेले दृश्य, आपल्या तिन्ही सैन्यांचे शौर्य आश्चर्यकारक आहे. ही गर्जना आभाळात, हे शौर्य जमिनीवर, हा विजय जयघोष सर्व दिशांनी गुंजत आहे, हीच नव्या भारताची हाक आहे. आज आपले पोखरण पुन्हा एकदा भारताची आत्मनिर्भरता, भारताचा आत्मविश्वास आणि भारताचा स्वाभिमान या त्रिमूर्तीचे साक्षीदार बनले आहे. हे पोखरण आहे, जे भारताच्या अणुशक्तीचे साक्षीदार आहे आणि आज येथे आपण स्वदेशीकरणाच्या माध्यमातून सक्षमीकरणाची ताकद पाहत आहोत. भारत शक्तीचा हा उत्सव शौर्यभूमी असलेल्या राजस्थानमध्ये होत आहे.
मात्र त्याचा प्रतिध्वनी केवळ भारतातच नाही तर जगभरात ऐकू येत आहे. आत्मनिर्भर भारताशिवाय विकसित भारताची कल्पना शक्य नाही. भारताचा विकास करायचा असेल तर इतरांवरील अवलंबित्व कमी करावे लागेल. त्यामुळे आज भारत खाद्यतेलापासून आधुनिक विमानापर्यंत प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबनावर भर देत आहे.
आमच्या तोफा, रणगाडे, लढाऊ जहाजे, हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्र यंत्रणेची गर्जना जी तुम्ही पाहत आहात, ही भारतशक्ती आहे. शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा, दळणवळणाची साधने, सायबर आणि अंतराळ यापासून आपण मेड इन इंडियाच्या उड्डाणाचा अनुभव घेत आहोत. असं मोदींनी सांगितलं.