• Download App
    वीर सावरकरांचा इतिहास आता मध्य प्रदेशातील मुलांना शिकवला जाणार, शिवराजसिंह चौहान सरकारची घोषणा! The history of Veer Savarkar will now be taught to the children of Madhya Pradesh Shivraj Singh Chouhan government announced

    वीर सावरकरांचा इतिहास आता मध्य प्रदेशातील मुलांना शिकवला जाणार, शिवराजसिंह चौहान सरकारची घोषणा!

    उत्तर प्रदेशनंतर आता मध्य प्रदेश सरकारनेही हा निर्णय घेतला

    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महानायक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उर्फ वीर सावरकर यांचे चरित्र आता विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे. उत्तर प्रदेशनंतर आता मध्य प्रदेश सरकारनेही हा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेश बोर्डाच्या अभ्यासक्रमात वीर सावरकरांच्या चरित्राशी संबंधित एक अध्याय जोडण्यात येणार आहे. मध्य प्रदेश सरकारचे शालेय शिक्षण राज्यमंत्री इंदर सिंग परमार यांनी ही घोषणा केली आहे. The history of Veer Savarkar will now be taught to the children of Madhya Pradesh Shivraj Singh Chouhan government announced

    मध्य प्रदेशचे शिक्षण राज्यमंत्री इंदरसिंग परमार यांनी जाहीर केले की, ‘दुर्दैवाने काँग्रेस सरकारांनी भारतातील क्रांतिकारकांना इतिहासाच्या पानांमध्ये स्थान दिले नाही. परकीय आक्रमकांचे वर्णन महान असे केले. आता आम्ही मुलांना भारतातील क्रांतिकारकांबद्दल शिकवण्याचे काम करू, त्यामुळे आम्ही नवीन अभ्यासक्रमात वीर सावरकरांचे चरित्र समाविष्ट करणार आहोत.

    योगी सरकारनेही केली होती घोषणा –

    याआधी २३ जून रोजी योगी सरकारने वीर सावरकरांचे अध्याय उत्तर प्रदेश बोर्डाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केल्याची घोषणा केली होती. वीर सावरकरांच्या चरित्राचा आता उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (UPMSP) अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

    The history of Veer Savarkar will now be taught to the children of Madhya Pradesh Shivraj Singh Chouhan government announced

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Ranveer Singh : रणवीर सिंहविरोधात FIR दाखल; चावुंडी दैव परंपरा आणि हिंदू भावनांचा अपमान केल्याचा आरोप

    Economic Survey 2026 : देशाचे ‘आर्थिक रिपोर्ट कार्ड’ संसदेत सादर; FY27 मध्ये GDP वाढ 6.8% ते 7.2% राहण्याचा अंदाज, महागाई-नोकऱ्यांवरही अपडेट

    Waqf Board : चारधाममध्ये गैर-हिंदूंना बंदीच्या समर्थनार्थ वक्फ बोर्ड; अध्यक्ष म्हणाले– श्रद्धा नसेल तर तीर्थक्षेत्रात जाण्याचा हट्ट का, प्रवेशबंदी योग्यच