…तर उद्या तुम्हाला तुमची भाषा आणि संस्कृती पण गमवावी लागेल.
विशेष प्रतिनिधी
अलिबाग : आजपर्यंतच्या जगभरातील लढाया या जमिनीच्या किंवा भूभागाच्या मालकी हक्कावरूनच झाल्या आहेत आणि मराठी जनांनी जमीन गमावली तर उद्या तुम्हाला तुमची भाषा आणि संस्कृती पण गमवावी लागेल. असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे अलिबागमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.The history of the world is not without geography Raj Thackerays statement
शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतू झाला, रायगड जिल्हा मुंबईशी थेट जोडला गेला. धनदांडग्यांना आपला रायगड जिल्हा हाकेच्या अंतरावर आला. खरंतर रस्ते हे प्रगतीचे वाहक असतात पण महाराष्ट्रात त्या प्रगतीमागून दबक्या पावलांनी येणारी समाजाची अवनती मराठी माणसाच्या अस्तित्वावर घाव घालते. म्हणून रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी जागल्याची भूमिका घ्यावी, जागृत राहावं… लोकांना शहाणं करावं, असं ते म्हणाले आहेत.
राज ठाकरेंनी अलिबागमध्ये पत्रकारांशी संवाद साधला, त्या परिसंवादातील महत्वाचे मुद्दे : –
”आज मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड इथे मोठ्या प्रमाणावर कशा जमिनी बळकावल्या जात आहेत ह्याचं पुरेसं भान आपल्याला आलेलं दिसत नाहीये. अलिबागच्या परिसरातील अनेक गावातील जमिनी आज विकल्या गेल्या आहेत. मला समजू शकतं की जमीन विकून मिळणारा पैसा प्रत्येकाला हवा आहे पण जमीन विकल्यावर ती कोणाच्या घशात जात आहे, तुम्हाला पुरेसा भाव मिळतोय का ह्याची खात्री करून घेताय का?”
”जगाचा इतिहास भूगोलाशिवाय नाही, सगळा खटाटोप जमिनीच्या मालकीसाठीच झाला. आज ट्रान्सहार्बर झालाय ह्यामुळे रायगडमधल्या जमिनी स्थानिक लोकांच्या हातातून जाणार, हे नक्की. आज दुबईमध्ये तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा असेल तर तिथल्या अरबांना भागीदार करून घ्यावं लागतं तरच तुम्ही तिथे व्यवसाय करू शकता… मग तुम्ही रायगडमध्ये सुरु होणाऱ्या व्यवसायांत तुम्ही भागीदार का होत नाही? आज जमिनींचे जे रजिस्ट्रेशन सुरु आहे त्यात जमिनी कोण घेत आहे ह्याचा एकदा तपास घ्याच. तुम्हालाही कळेल आपण किती बेसावध आहोत.”
”आज ठाणे जिल्ह्यात ७ महानगरपालिका आहे, हे का झालं ? कारण बाहेरून येणारे लोंढे. हे आक्रमण आहे हे तुम्हाला जाणवतंय का ? एक दिवस असा असेल तुमच्या हातात पश्चातापाशिवाय काही राहणार नाही. तुम्हाला वाटेल मी घाबरवतोय, तर हो घाबरवतोय कारण बाकी कुठलाही राजकीय नेता तुम्हाला हे सांगणार नाही.”
” काश्मीरमध्ये ३७० कलम काढलं, त्याने नक्की काय घडलं हे बाजूला. ३७० कलम होतं तेंव्हा तुम्ही तिकडे बाहेरच्यांना जमीन घ्यायला परवानगी नाही. हिमाचल, उत्तराखंड, आसाममध्ये बाहेरच्यांना जमीन घेता येत नाही मग महाराष्ट्रात का घेऊ दिल्या जात आहेत? आपण आपली जमीन वाचवली पाहिजे. आज महाराष्ट्रात जे जे उत्तम आहे ते सर्वबाजूनी बळकवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच, आज मी अप्पासाहेब धर्माधिकारींना भेटलो होतो. त्यांच्याकडे खूप मोठी ताकद आहे, मी त्यांना विनंती केली की त्यांनी पण ह्या विषयवार लोकांचं प्रबोधन करावं. असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.”
The history of the world is not without geography Raj Thackerays statement
महत्वाच्या बातम्या
- हायकोर्टाने केले स्पष्ट, जरांगेंना रोखणार नाही, कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची
- डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई वाढून 5.69% वर; खाद्यपदार्थांच्या वाढत्या किंमतींमुळे वाढ
- अयोध्येच्या सोहळ्यात 11 कुटुंबांना पूजेचा मान; त्यामध्ये तुळजापूरच्या महादेव गायकवाडांचा सहभाग!!
- राम मंदिराच्या दिव्य स्वप्नपूर्तीसाठी नियतीने मोदींना निवडले… राम मंदिर आंदोलनाचे मूळ शिलेदार अडवाणींच्या भावना