कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बालकांवरील उपचारसााठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये बालकांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन देता येणार नाही, असे त्यामध्ये म्हटले आहे. त्याबरोबर स्टिरॉईडसचा वापर केवळ आणिबाणीच्या परिस्थितीतच करायचा आहे.The guidelines of the Union Ministry of Health, Remedesivir, cannot be used for the treatment of children
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बालकांवरील उपचारसााठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
यामध्ये बालकांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन देता येणार नाही, असे त्यामध्ये म्हटले आहे. त्याबरोबर स्टिरॉईडसचा वापर केवळ आणिबाणीच्या परिस्थितीतच करायचा आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १८ वर्षांखालील कोरोना रुग्णांवर उपचारासाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेंत.
मुलांवर उपचार करताना रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा वापर टाळण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर अति गंभीर आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांनाच स्टिरॉईडस द्यायचे आहे. रेमडेसिव्हीर हे इंजेक्शनच पुरेसे सुरक्षित नाही. त्याचबरोबर कोरोनावर उपचारासाठी ते कितपत प्रभावी ठरते याबाबत अद्याप ठोस पुरावे मिळालेले नाहीत.
१२ वर्षांवरील बालकांमध्ये ऑक्सिजन लेव्हल तपासण्यासाठी सहा मिनिट वॉक टेस्ट (सहा मिनिटे चालून ऑक्सिजनची पातळी तपासणे) करण्याची सूचना केलीआहे. बोटाला ऑक्सिमीटर लावून मुलांना सहा मिनटे चालावयास सांगितले जाते.
ऑ क्सिजन पातळी ९४ टक्केंपेक्षा कमी झाली किंवा ३ ते ५ टक्के कमी झाली अथवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तातडीने रुग्णालयात भरती करण्याची सूचना केली आहे. दम्याचा त्रास असणाऱ्या मुलांची ही चाचणी करू नये असे म्हटले आहे.
मुलांची प्रकृती गंभीर झाल्यास ऑक्सिजन थेरपी, कॉरटिकोस्टेरॉईडस थेरपीचा वापर करण्यास सांगितले आहे. लक्षणे नसलेल्या आणि संसर्गाचे प्रमाण कमी असलेल्या मुलांवर स्टेरॉईडसचा वापर करू नये अशा सूचना दिल्या गेल्या आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच स्टेरॉईडचा वापर करण्यास सांगितले आहे.
The guidelines of the Union Ministry of Health, Remedesivir, cannot be used for the treatment of children
महत्त्वाच्या बातम्या
- सततच्या नकारात्मकतेमुळे आंबेडकरी समाजात कट्टरतावाद वाढण्याचा धोका
- नरेंद्र मोदींनी आदेश दिला तर ‘वाघा’शीही करु दोस्ती
- पहिल्याच पावसात शिवसेनेने मुंबई तुंबवून दाखवली
- ‘आम्हाला ‘ब्लडी इंडियन्स’ म्हणणारे इंग्रज आता आमचा पार्श्वभाग चाटतात’