• Download App
    'द ग्रेट खली'ने भाजपच्या समर्थनार्थ कानपूरमध्ये केला रोड शो!|The Great Khali did a road show in support of BJP in Kanpur

    ‘द ग्रेट खली’ने भाजपच्या समर्थनार्थ कानपूरमध्ये केला रोड शो!

    पाहण्यासाठी नागरिकांची दुतर्फा गर्दी, जाणून घ्या खलीने काय म्हटले?


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील कानपूर लोकसभा मतदारसंघात राजकारण तापले आहे. येथे भाजप आणि इंडी आघाडी यांच्यात चुरशीची लढत आहे. शुक्रवारी एकीकडे राहुल गांधी आणि अखिलेश यादव एकत्र निवडणूक रॅली काढणार असताना दुसरीकडे भाजपचे उमेदवार रमेश अवस्थी यांच्या समर्थनार्थ भाजपने आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू द ग्रेट खलीला मैदानात उतरवले.The Great Khali did a road show in support of BJP in Kanpur



    द ग्रेट खली म्हणून प्रसिद्ध असलेले कुस्तीपटू दिलीप सिंह राणा गुरुवारी कानपूर येथे पोहोचले, जिथे त्यांनी भाजप उमेदवार रमेश अवस्थी यांच्या समर्थनार्थ रोड शो केला आणि जनतेला भाजपच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांना पाहण्यासाठी कानपूरच्या रस्त्यांवर गर्दी झाली होती. खलीची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले दिसले.

    यावेळी ग्रेट खलीने लोकांना भाजपला मत देण्याचे आवाहन करत लोकांना राम मंदिराची आठवण करून दिली. सनातन धर्माला मानणाऱ्यांनी अयोध्येतील प्रभू राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचे निमंत्रण नाकारणाऱ्या पक्षांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्याचे काम करावे, असे ते म्हणाले. हा भारतीय संस्कृतीचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    The Great Khali did a road show in support of BJP in Kanpur

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!