विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सरकार चचेर्ला तयार आहे, पण विरोधकच चचेर्साठी तयार आणि गंभीर नाहीत, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते रविशंकरप्रसाद यांनी केल आहे. पेगाससवर मंत्री संसदेत भूमिका मांडत असताना विरोधी सदस्यांनी त्यांच्या हातातील कागद फाडून फेकले. चर्चाच करायची नसल्यामुळे विरोधकांनी असा प्रकार केला, विरोधक या मुद्यावर गंभीर नसल्याचे यातून दिसून येते, असे त्यांनी म्हटले आहे.The government is ready for discussion but the opposition is not ready for discussion, Ravi Shankar Prasad alleged
प्रसाद म्हणाले, अहंकार आणि व्यक्तिगत स्वार्थात आंधळे झालेल्या विरोधकांच्या मनमानीमुळे सरकारी तिजोरीचे 130 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. विरोधी पक्षांच्या राजकारणात राष्ट्रीय हिताला कोणतेच स्थान नाही. या मुद्यावर आम्हाला काँग्रेसला अनेक प्रश्न विचारायचे आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी संसदेच्या माध्यमातून द्यावी.
रविशंकरप्रसाद म्हणाले की, विरोधकांना पेगाससच्या मुद्यावर खरोखरच संसदेत चर्चा हवी आहे अथवा नाही हे ठरवावे. पेगाससच्या मुद्यावर विरोधक संसदेत गोंधळ घालत आहे, पण त्यांनी आपला मोबाईल टॅप झाल्याचा आतापर्यंत एकही पुरावा दिला नाही.
कोरोनाच्या मुद्यावरही काँग्रेस पक्ष गंभीर नाही. या मुद्यावर पंतप्रधानांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतही काँग्रेस सहभागी झाली नाही. 1947 पासून काँग्रेस 50 वर्षे देशात सत्तेवर होती, पण आता सत्तेवर नसताना काँग्रेसची वागणूक बदलली आहे, काँग्रेसची ही बदललेली वागणूक योग्य आहे का असा प्रश्न देश त्यांना विचारत आहे.
संसद चालू देण्याबाबत काँग्रेस पक्षाचा एक अलिखित नियम आहे, परिवाराचे हित असेल, तर संसद चालू दिली जाईल आणि परिवाराचे हित नसेल तरल संसद चालू दिली जाणार नाही, असा आरोप प्रसाद यांनी केला आहे.
The government is ready for discussion but the opposition is not ready for discussion, Ravi Shankar Prasad alleged
महत्त्वाच्या बातम्या
- आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTOला चकरा मारण्याची गरज नाही, NGO आणि ऑटो कंपनीदेखील देऊ शकणार परवाने
- कलम 370 पासून मुक्तीची दोन वर्षे : फुटीरतावादाची निघाली हवा, देशद्रोह्यांचा आवळला फास, दगडफेक करणारेही झाले गायब
- यूकेने भारताला रेड लिस्टमधून काढले, 10 दिवसांचे हॉटेल क्वारंटाइन बंद, आता फक्त होम आयसोलेशन
- Tokyo Olympics : कुस्तीमध्ये भारताला धक्का, जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची पैलवान विनेश उपांत्यपूर्व फेरीत पराभूत