विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मंदीच्या गर्तेत नेले होते. मात्र, सरकारने राबविलेल्या विविध उपाययोजा आणि कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन होत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.The good news is, the economy is reviving, wages are rising
देशातील संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कामगार-कर्मचाऱ्यांची नोंदणी भविष्य निर्वाह नोंदणी करणे (प्रॉव्हिडंट फंड) गरजेचेअसते. कामगार मंत्रालयाच्या माहितीनुसार भविष्य निर्वाह निधीमध्ये नोंदणी असलेल्या कर्मचाºयांच्या वेतनात सातत्याने वाढ होत आहे.
त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधीत नोंद असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात यंदाच्या वषी ७७.०८ लाख रुपयांने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हीवाढ ७८.५८ लाख झाली होती. त्यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा एकदा पुनरुज्जीवीत होत असल्याचे म्हटले जात आहे.
कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर देशव्यापी लॉकडाऊन लावण्यात आला होता. सर्व उद्योग व्यवसाय बंद होते. मात्र, त्यानंतर मोदी सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. उद्योग सुरू करण्यास प्राधान्य देण्यात आले.
त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेज देण्यात आले. त्यामुळे उद्योगांना नवसंजीवनी मिळाली. त्याचा फायदा आता दिसू लागला आहे.
The good news is, the economy is reviving, wages are rising
महत्त्वाच्या बातम्या
- ठाण्यात अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या महिला सहाय्यक आयुक्तांवर फेरीवाल्यांचा हल्ला, हाताची दोन बोटे कापली गेल्याने तुटून पडली
- राजनाथ सिंह यांचे मोठं विधान : म्हटले- पाकिस्तान थेट लढण्याची हिंमत करत नाही,चीनला नाही करू देणार मनमानी
- संकटाचा आवाज : ओसामा बिन लादेनचा माजी सहाय्यक अमीन-उल-हक अफगाणिस्तानात परतला, पाकिस्तानमध्ये घालवली 20 वर्षे
- सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया एप्रिलच्या तुलनेत लसीचे उत्पादन दुप्पट करणार