कामगार आणि रोजगार मंत्रालयाने वेरिएबल महागाई भत्ता दुप्पट करण्याचा निर्णय घेतलाय. याचा फायदा दीड कोटी कर्मचाऱ्यांना होणार आहे. पूर्वी व्हेरिएबल महागाई भत्ता दरमहा 105 रुपये होता, तो दरमहा वाढवून 210 रुपये करण्यात आलाय. नवीन व्हेरिएबल महागाई भत्ता 1 एप्रिल 2021 पासून लागू होईल. सरकारच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारमधील कर्मचारी आणि कामगारांच्या किमान वेतनात वाढ होईल.The good news for 1.5 crore employees is that the variable dearness allowance will be doubled
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: कामगार आणि रोजगार मंत्रालयाने वेरिएबल महागाई भत्ता दुप्पट करण्याचा निर्णय घेतलाय. याचा फायदा दीड कोटी कर्मचाऱ्यांना होणार आहे. पूर्वी व्हेरिएबल महागाई भत्ता दरमहा 105 रुपये होता, तो दरमहा वाढवून 210 रुपये करण्यात आलाय.
नवीन व्हेरिएबल महागाई भत्ता 1 एप्रिल 2021 पासून लागू होईल. सरकारच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारमधील कर्मचारी आणि कामगारांच्या किमान वेतनात वाढ होईल.
कामगार मंत्रालयाच्या या निर्णयाचा फायदा केंद्रीय कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, खाणी, तेल फील्ड, बंदर कर्मचाऱ्यांना होईल. कंत्राटी आणि प्रासंगिक कामगार दोघांनाही याचा फायदा होईल. मुख्य कामगार आयुक्त डीपीएस नेगी म्हणाले की, महागाई भत्त्यामध्ये दरमहा 100 टक्के वाढ केली.
आता दरमहा 105 रुपयांऐवजी 210 रुपये दरमहा मिळतील. याचा फायदा दीड कोटी कामगारांना होईल, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी दिली.
यावेळी संपूर्ण देश कोरोना संकटाशी झुंज देत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या सर्व वेळापत्रकातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. व्हेरिएबल महागाई भत्ता औद्योगिक कामगारांसाठी सरासरी ग्राहक किंमत निदेर्शांकाच्या आधारावर निश्चित केला जातो.
डियरनेस अलाऊन्स ज्याला महागाई भत्ता म्हटले जाते, ते दोन प्रकारचे असतात. पहिला औद्योगिक महागाई भत्ता आणि दुसरे व्हेरिएबल महागाई भत्ता. व्हेरिएबल महागाई भत्त्याचे पुनरावलोकन दर सहा महिन्यांनी होते.
The good news for 1.5 crore employees is that the variable dearness allowance will be doubled