वृत्तसंस्था
लंडन : बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेतील पुरूषांच्या 67 वजन गटात भारताच्या जेरेमी लालरिनुंगा सुवर्णपदक जिंकत बर्मिंगहॅममध्ये देशाचा तिरंगा अभिमानाने फडकावला. पहिल्यांदाच कॉमनवेल्थ स्पर्धेत सहभागी झालेल्या जेरेमी लालरिनुंगानं आपला दबदबा कायम ठेवत स्नॅचमध्ये 140 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो असे एकूण 300 किलो वजन उचलत सोनेरी यश संपादन केले. The gold medal was won, but weightlifter Jeremy Lalrinunga’s performance leap was even greater
सुवर्णपदक जिंकल्याचा मला आनंद आहे, परंतु मी माझ्या कामगिरीवर समाधानी नाही. मी आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत होतो. अशी कामगिरी मी भविष्यात नक्की करून दाखवेन. देशासाठी सुवर्ण जिंकणे हा अभिमानाचा क्षण आहे, असे जेरेमी लालरिनुंगाने म्हटले आहे.
वेटलिफ्टिंगच्या 67 वजनी गटात सुवर्ण कामगिरी करणाऱ्या जेरेमीने स्नॅच इव्हेंटमध्ये 140 किलो वजन उचलून नव्या विक्रमाला गवसणी घातली. तसेच क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो वजन उचलून एकूण 300 किलो ग्रॅम वजन उचलले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हा देखील एक नवीन विक्रम आहे. या स्पर्धेतील अखेरच्या प्रयत्नात जेरेमीला अपयश आले. मात्र, तरीही त्यानं सुवर्णपदकावर नाव कोरून बर्मिंगहॅम येथे भारताचा तिरंगा फडकावला.
पहिलीच कॉमनवेल्थ स्पर्धा
जेरेमी हा मिझोराममधील आयझोल येथील रहिवासी आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेतील त्याचं पहिलेच वर्ष आहे. याआधी 2018 मध्ये त्यानं युवा ऑलम्पिक स्पर्धेतील 62 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. एवढेच नव्हेतर, गेल्या वर्षी पार पडलेल्या 67 वजनी गटातही त्याने सुवर्णपदक जिंकले.