वृत्तसंस्था
उडपी : कर्नाटकात हिजबावरून वातातवरण तापले आहे. त्या वादाचे उडुपी शहर केंद्रबिंदू ठरले आहे. पण, त्या पूर्वी येथील हिंदू आणि मुस्लिम मुली या एकत्र बसून आपले डबे वाटून खात होते. आता हिजाब वादांमुळे त्यांच्यात फूट पडली आहे. The girls who used to dine together in Udupi are now divided into Hindu-Muslim
एकंदरीत त्यांच्या मैत्रीत हिजाब आला अडवा आल्याचे चित्र आहे. एकेकाळी उडुपीत एकत्र जेवण करणाऱ्या मुली आता हिजाब वादामुळे हिंदू-मुस्लिम अशा विभागल्या गेल्या आहेत. समुद्र किनाऱ्यावरील शांत शहर अशी उडुपीची ओळख आहे. हिजाब वादामुळे त्याच्या मैत्रीत दिवार उभी राहिली, असे काही मुस्लिम विद्यार्थिनींनी सांगितले.
हिजाब एवढा मोठा मुद्दा कसा बनला, या विचाराने जरीना अस्वस्थ होते. दहा वर्षांपूर्वी उडुपीमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केलेली जरीना म्हणते, “अशा प्रकारे हिजाबचे समर्थन किंवा विरोधही केला गेला नाही. सर्व धर्माच्या मुली टिफीन एकत्र खायच्या.”
“मी डोक्यावर स्कार्फ घालत असे. मला कधी कोणी विरोध केल्याचे आठवत नाही. त्यावेळी स्कार्फ होते, पण, हिजाब नव्हता” असे जरीना सांगते.
डिसेंबरच्या उत्तरार्धात, उडुपी जिल्ह्यातील गव्हर्नमेंट गर्ल्स प्री युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये काही विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास बंदी घातली. त्यानंतर विरोध करण्यास सुरुवात केली. त्याचे पडसाद देशात उमटले.
आधी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, नंतर राष्ट्रीय मीडिया आणि आता आंतरराष्ट्रीय मीडियाच्या मथळ्यांमध्ये झळकले. हिजाब घालण्याच्या अधिकाराबाबत या मुलींची याचिका आता कर्नाटक उच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठात प्रलंबित आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत हिजाब घालण्यास बंदी घातली आहे. यापूर्वी, कर्नाटक सरकारने हिजाबच्या मुद्द्याचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती देखील स्थापन केली होती. शाळा समित्यांनी देखील मुलींना वर्गात हिजाब घालण्याची परवानगी न देण्याचे आदेश दिले होते.
The girls who used to dine together in Udupi are now divided into Hindu-Muslim
महत्त्वाच्या बातम्या
- पूर्वोत्तर राज्ये भारताचा भाग नाही, भारताचे वर्णन केवळ ‘गुजरात ते बंगाल’; राहुल गांधीविरोधात तक्रार
- सरकारी नोकऱ्यांमध्ये 21,255 पदे रिक्त दोन वर्षांत 2,65,468 पदे भरली
- रशिया या आठवड्यात युक्रेनवर हल्ला करणार 16 फेब्रुवारी हा हल्ल्याचा दिवस : व्लादिमीर झेलेन्स्की
- गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक : कोश्यारी सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण