• Download App
    उत्तर प्रदेशातून गुन्हेगारीचा उच्चाटन करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आता गॅँगस्टरच्या पत्नी उतरल्या|The gangster's wife has now come out against Yogi Adityanath who has eradicated crime from Uttar Pradesh

    उत्तर प्रदेशातून गुन्हेगारीचा उच्चाटन करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आता गॅँगस्टरच्या पत्नी उतरल्या

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारांविरुध्द कडक मोहीम राबविली. आठ पोलीसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेचा पोलीसांनी एन्काऊंटर केला. निवडणुकीच्या तोंडावर आता गॅँगस्टरच्या पत्नी योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात उतरल्या आहेत.The gangster’s wife has now come out against Yogi Adityanath who has eradicated crime from Uttar Pradesh

    उत्तरप्रदेशातला कुख्यात गँगस्टर विकास दुबेची पत्नीने योगी सरकारवर गंभीर आरोप केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप विकास दुबेची पत्नी रिचा दुबे यांनी केला आहे. आमचे कुटुंब हेलपाटे घालतेय पण सुनावणी होत नसल्याचेही दुबेंनी म्हटले आहे.



    कानपूरमध्ये बिकरू भागात ८ पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या केल्याचा आरोप विकास दुबेवर होता. या हत्याकांडानंतर पोलिसांनी केलेल्या एनकाऊंटरमध्ये विकास दुबे मारला गेला होता.विकास दुबेची पत्नी रिचा दुबे यांनी म्हटलं आहे की, आम्हाला खूप वाईट पद्धतीने छळलं जात आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला माघार घेण्यास प्रवृत्त केलं जात आहे.

    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही गोष्ट स्वत:वर घेतली असून ते आम्हाला त्रास देत आहेत. आजपर्यंत मला माझ्या नवऱ्याच्या मृत्यूचा दाखला मिळालेला नाही. कोणाला विचारलं तर सांगतात की हे प्रकरण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे आहे. सुनावणी होत नाही. आम्ही दवाखान्यापासून पोस्टमार्टम हाऊसपर्यंत सगळीकडे नुसते हेलपाटे घालतोय.

    रिचा दुबेने सांगितलं, माझे वयोवृद्ध सासू सासरेही न्यायाच्या प्रतिक्षेत भटकत आहे. माझ्या दिराची मुलं शिकू शकत नाहीयेत. आमच्याकडे जगण्यासाठी कोणतंच साधन शिल्लक नाही. आमच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. भाजपाचे लोक आमच्या जमिनी आणि शेती लाटत आहे.

    शासन, प्रशासन कोणीही आमचं ऐकून घ्यायला तयार नाही. परिस्थिती तर अशी आहे की शेतात धान्य तर आहे, पण ते विकलंच जात नाही. कारण काय तर हे पीक विकास दुबेच्या शेतातलं आहे. आम्हाला यामुळे आता जगणं मुश्किल होऊन बसलं आहे.

    The gangster’s wife has now come out against Yogi Adityanath who has eradicated crime from Uttar Pradesh

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार