नजीकच्या भविष्यात तुम्हाला इंटरनेट कनेक्शनशिवाय व्हिडिओ, क्रिकेट, चित्रपट आणि इतर मल्टीमीडिया कंटेंट थेट तुमच्या मोबाइलवर पाहता येणार आहे. याला डायरेक्ट-टू-मोबाइल म्हणजेच D2M ब्रॉडकास्टिंग तंत्रज्ञान म्हणतात. दूरसंचार विभाग आणि देशातील सार्वजनिक सेवा प्रसारक प्रसार भारती एकत्र येऊन यावर काम करत आहेत. या तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी DoT ने गेल्या वर्षीच IIT कानपूरसोबत करार केला होता. The Focus Explainer: Now watch live video, movies and cricket on mobile without internet; What is D2M technology? Read about the new revolution
या पार्श्वभूमीवर समजून घेऊया की, D2M तंत्रज्ञान काय आहे? इंटरनेटशिवाय थेट मोबाइलवर व्हिडिओ कसा पाहता येणार? यामुळे काय-काय बदलणार?
डायरेक्ट-टू-मोबाइल म्हणजे काय?
डायरेक्ट-टू-मोबाइल ब्रॉडकास्ट (D2M) म्हणजे व्हिडिओ आणि इतर मल्टीमीडिया कंटेंट थेट तुमच्या मोबाइलवर प्रसारित करणे होय. सोप्या शब्दांत सांगायचे तर इंटरनेट, केबल किंवा डीटीएच शिवाय, तुम्हाला बातम्या, क्रिकेट इत्यादींचे थेट मोबाईल फोनवर व्हिडिओ प्रसारण करण्याची सुविधा मिळेल. यासोबतच, चित्रपटांपासून ते Hotstar, Sony Liv, Zee Five, Amazon Prime आणि Netflix यासारखे अॅप्स आणि इतर मल्टीमीडिया कंटेंट इंटरनेटशिवाय थेट तुमच्या फोनवर पाहता येतील.
हे सर्व मोबाइलवर एफएम रेडिओ ऐकण्यासारखे आहे. यात फोनमधील रिसीव्हर रेडिओ फ्रिक्वेन्सी सुधारतो. याद्वारे लोक एकाच फोनवर अनेक एफएम चॅनेल ऐकू शकतात. त्याचप्रमाणे, D2M द्वारे मल्टीमीडिया कंटेंट थेट फोनमध्ये प्रसारित केला जाऊ शकतो. वास्तविक, हे तंत्रज्ञान ब्रॉडबँड आणि ब्रॉडकास्ट यांना एकत्र करून तयार केले जात आहे.
यामुळे काय फायदा होणार?
या तंत्रज्ञानाद्वारे लाइव्ह न्यूज, खेळांचे सामने आणि OTT कंटेंट इंटरनेट कनेक्शनशिवाय तुमच्या मोबाइल पाहता येईल. विशेष म्हणजे फोनमध्ये थेट प्रसारित केलेले व्हिडिओ आणि इतर मल्टीमीडिया कंटेंट बफरिंगशिवाय चांगल्या क्वालिटीचा मिळेल, कारण यासाठी कोणताही इंटरनेट डेटा लागणार नाही.
या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा असा होईल की नागरिकांशी संबंधित कोणतीही विशिष्ट माहिती थेट त्यांच्या मोबाइलवर प्रसारित केली जाऊ शकते, ज्यामुळे फेक न्यूज रोखणे, आपत्कालीन अलर्ट जारी करणे आणि आपत्ती व्यवस्थापनात मोठी मदत होईल.
माफक किमतीत ग्राहकांना मिळेल सुविधा
D2M तंत्रज्ञानामुळे मोबाइल ग्राहकांचे जग बदलेल असा विश्वास आहे. याद्वारे, ते कोणताही मोबाइल डेटा खर्च न करता थेट त्यांच्या मोबाइलवर व्हिडिओ ऑन डिमांड म्हणजेच VoD किंवा OTT कंटेंट मिळवू शकतील. मुख्य म्हणजे त्यांना ही सुविधा अतिशय कमी खर्चात मिळणार आहे. याद्वारे, ग्रामीण भागात उपस्थित असलेल्या मोबाइल ग्राहकांनाही व्हिडिओ कंटेंट सहज पाहता येणार आहे, ज्यांच्याकडे इंटरनेट सुविधा नाही अशांसाठी याचा मोठा फायदा होणार आहे.
व्यावसायिकांना काय फायदा?
याचा सर्वात मोठा फायदा दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांना होऊ शकतो. जे त्यांच्या मोबाइल नेटवर्कवरून D2M तंत्रज्ञानासह प्रसारण नेटवर्कवर व्हिडिओ ट्रॅफिक ऑफलोड करू शकतात. यामुळे त्यांचे बहुमूल्य मोबाइल स्पेक्ट्रम वाचेल. मोबाइल स्पेक्ट्रमचा वापर सुधारेल आणि बँडविड्थवरील ताण कमी होईल, ज्यामुळे कॉल ड्रॉप कमी होण्यास आणि डेटाचा वेग वाढण्यास मदत होईल.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा म्हणतात की, डायरेक्ट-टू-मोबाइल म्हणजेच D2M मुळे ब्रॉडकास्टर्सना फायदा होईल कारण त्यांना नवीन प्रेक्षक मिळतील. सध्या, देशातील प्रसारण ग्राहकांची संख्या केवळ 20-21 कोटी कुटुंबांपुरती मर्यादित आहे ज्यांच्याकडे दूरदर्शन आहे.
डायरेक्ट-टू-मोबाइल तंत्रज्ञानाचा परिचय करून दिल्याने, ब्रॉडकास्टर्सच्या ग्राहकांची संख्या अनेक पटींनी वाढेल, जी येत्या काही वर्षांत 100 कोटींपर्यंत पोहोचू शकते, जी 2026 पर्यंत देशातील स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या असेल. चंद्राचा विश्वास आहे की D2M लोकांच्या पाहण्याच्या सवयी बदलेल आणि देशातील बातम्या पाहण्याचे प्रमाण अनेक पटींनी वाढेल.
D2Mसाठी सरकार काय करतंय?
DoT ने स्पेक्ट्रम बँड वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनवर थेट ब्रॉडकास्ट सुविधा पुरवण्याच्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. DoT आणि प्रसार भारती यांनी यासाठी IIT कानपूरसोबत करार केला आहे. DoT सचिव के राजारामन म्हणतात की, 526-582 MHz हा बँड मोबाईल आणि ब्रॉडकास्ट दोन्ही सेवांसाठी काम करू शकतो. दूरसंचार विभागाने या बँडचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. सध्या, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे देशभरातील टीव्ही ट्रान्समीटरसाठी हा बँड वापरला जात आहे.
5G ब्रॉडबँड आणि ब्रॉडकास्टमुळे घडणार क्रांती
D2M तंत्रज्ञान ब्रॉडबँड आणि ब्रॉडकास्टच्या अभिसरणाने तयार केले जाईल. दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ‘डायरेक्ट-टू-मोबाइल आणि 5जी ब्रॉडबँड कन्व्हर्जन्स रोडमॅप फॉर इंडिया’ परिषदेत सहभागी होताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा म्हणाले की, डायरेक्ट-टू-मोबाइल आणि 5जी ब्रॉडबँडचे अभिसरण म्हणजे भारतात ब्रॉडबँड आणि स्पेक्ट्रम वापर सुधारेल. ते म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या अपग्रेडेशनमुळे आता ब्रॉडबँड सेवांसाठी ब्रॉडकास्टिंग सेवा आणि ब्रॉडकास्टिंग सेवेसाठी ब्रॉडबँड सेवा प्रदान करणे शक्य आहे.
The Focus Explainer: Now watch live video, movies and cricket on mobile without internet; What is D2M technology? Read about the new revolution
महत्वाच्या बातम्या
- MPSC नोकरीची संधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 1085 रिक्त जागांसाठी भरती
- पोस्टात नोकरीची संधी : महाराष्ट्रात 3026 पदांची भरती; आज 5 जून अर्जासाठी शेवटचा दिवस!!
- ही तो श्रींची इच्छा ते बाळासाहेबांची इच्छा!!
- सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांना हवाय राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री; तर सुनील तटकरे म्हणतात देवेंद्र फडणवीस उत्तम!!