• Download App
    हंगामातील पहिली मँगो स्पेशल ट्रेन धावली ; आंध प्रदेशातून नवी दिल्लीत आंबे घेऊन दाखल।The first mango special train of the season

    हंगामातील पहिली मँगो स्पेशल ट्रेन धावली ; आंध प्रदेशातून नवी दिल्लीत आंबे घेऊन दाखल

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : हंगामातील पहिली मँगो ट्रेन राजधानी नवी दिल्लीला शुक्रवारी पोचली आहे. आंबा म्हंटला की कोकणातील हापूस असे समीकरण ठरलेले असते. परंतु पहिली मँगो ट्रेन महाराष्ट्रातील कोकणातून नव्हे तर आंध्र प्रदेशातून दिल्लीकडे धावली आहे. The first mango special train of the season ran



    आंध प्रदेशातील विजयनगरम येथून केवळ आंब्याच्या पेट्यानी भरलेली रेल्वे रवाना केली होती. 200 टन वजनाच्या 11 हजार 600 पेट्या पाठविण्यात आल्या. आझादपुर मंडाइचे तेजिंदर सिंग म्हणाले, यापूर्वी रेल्वेने चिक्कू, केळी आणि संत्र्याची वाहतूक केली होती. त्यात प्रथम संत्री पाठविण्यात आली होती. आता आंबा वाहतूक करून रेल्वेने नवा पायंडा पाडला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी 20 विशेष रेल्वेद्वारे 4 हजार 350 टन आंब्याची वाहतूक केली होती.

    The first mango special train of the season

    Related posts

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार

    Raihan Vadra Engagement : प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहानचा मैत्रीण अवीवा बेगसोबत साखरपुडा; दोघांनाही फोटोग्राफी-फुटबॉलची आवड