• Download App
    हायड्रोजन इंधनावरील पहिली कार दिल्लीत धावणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती। The first car on hydrogen fuel will run in Delhi; Information of Union Minister Nitin Gadkari

    हायड्रोजन इंधनावरील पहिली कार दिल्लीत धावणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : हायड्रोजन इंधनावरील पहिली कार १६ मार्च रोजी दिल्लीत धावणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. The first car on hydrogen fuel will run in Delhi; Information of Union Minister Nitin Gadkari

    ते म्हणाले, सीएनजीवरील वाहनानंतर आता ग्रीन हायड्रोजनवर चालणारी वाहने शहरात आणत आहोत. ग्रीन हायड्रोजनवरील जगात रेल्वे आणि काही देशात कारही धावत आहेत. आता हायड्रोजन इंधनावरील देशातील पहिली कार दिल्लीत १६ मार्चपासून धावणार आहे. नंतर ती काही दिवसांत नागपुरात आणणार आहोत.



    नागपुरात १२ ते १४ मार्चदरम्यान खासदार औद्योगिक महोत्सव आयोजित केला आहे. त्याची माहिती देताना रविवारी ते बोलत होते.  ग्रीन हायड्रोजन निर्मिती प्रक्रिया प्रकल्प महापालिकेकडू शहरात राबवण्यात येणार आहे. कचरा आणि पाण्यातून हे ग्रीन हायड्रोजन इंधन निर्माण केले जाईल. ग्रीन हायड्रोजनचे विदर्भ हे केंद्र असणार आहे.

    विदर्भातील संपत्ती

    • विदर्भात ७५ टक्के पाणी आणि ८५ टक्के जंगल
    •  विदर्भात अनेक ठिकाणी मँगनीज आहे
    •  स्टील उद्योगांची मोठी क्षमता
    • बांगलादेशात विदर्भाचे कापड जात.
    •  विदर्भात उद्योगाची मोठी क्षमता आहे
    •  पर्यटनवाढीसाठी आता सफारीसाठी इलेक्ट्रिक वाहने त्यामुळे प्रदूषण आणि आवाज होणार नाही.

    आणखी वाचा

    The first car on hydrogen fuel will run in Delhi; Information of Union Minister Nitin Gadkari

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Toxic Cough Syrup : 2 राज्यांत कफ सिरपमुळे 23 मुलांचा मृत्यू; 5 राज्यांमध्ये कोल्ड्रिफ सिरपवर बंदी, सीबीआय चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

    Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत टाइप-7 बंगला अलॉट; नवा पत्ता- 95 लोधी इस्टेट; खासदाराच्या घरी राहत होते

    Lawyer Rakesh Kishor Kumar : CJI वर बूट फेकणाऱ्या वकिलाने म्हटले- घडले त्याबद्दल पश्चात्ताप नाही; नशेत नव्हतो, सरन्यायाधीशांच्या देवाबद्दलच्या विधानाने वाईट वाटले