• Download App
    इंदिरा लाटेत नरसिंह राव यांचा पराभव करून लोकसभेत निवडून गेलेले भाजपचे पहिले खासदार सी. जंगा रेड्डी यांचे निधन!! |The first BJP MP to be elected to the Lok Sabha after defeating Narasimha Rao in the Indira wave. Janga Reddy passes away

    इंदिरा लाटेत नरसिंह राव यांचा पराभव करून लोकसभेत निवडून गेलेले भाजपचे पहिले खासदार सी. जंगा रेड्डी यांचे निधन!! – पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली

    विशेष प्रतिनिधी

    वृत्तसंस्था : हैदराबाद भाजपचे भारतीय जनता पार्टीचे लोकसभेत निवडून गेलेले पहिले खासदार चंदुपटला जंगा रेड्डी यांचे आज हैदराबाद मध्ये निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. भाजपचे 1984 च्या इंदिरा लाटेत एक लोकसभा निवडणुकीत भाजपचे जे फक्त दोन नेते जिंकले होते त्यापैकी चंदुपटला जंगा रेड्डी हे पहिले खासदार होते.The first BJP MP to be elected to the Lok Sabha after defeating Narasimha Rao in the Indira wave. Janga Reddy passes away

    त्यांनी त्यावेळी अखंड आंध्र प्रदेशातील हनमकोंडा मतदारसंघातून त्यावेळचे परराष्ट्र मंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पी. व्ही. नरसिंह राव यांचा पराभव केला होता. भाजपचे दुसरे खासदार गुजरात मधल्या मेहसाणा मतदार संघातून ए. के. पटेल हे निवडून आले होते. परंतु पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सारख्या दिग्गज नेत्याचा पराभव केल्यामुळे सी. जंगा रेड्डी यांचा त्यावेळी राजकीय वर्तुळात खूप मोठा बोलबाला झाला होता.



    इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1984 ची निवडणूक झाली. त्यामुळे राजीव गांधी यांना इंदिरा गांधींच्या सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट उपयुक्त ठरली होती. या लाटेत झालेल्या निवडणुकीत अटल बिहारी वाजपेयी यांच्या सारखे दिग्गज नेते देखील पराभूत झाले होते. काँग्रेसचे 415 खासदार निवडून आले होते. भाजपने निवडणूक देशपातळीवरील लढवली असली तरी त्यांचे फक्त दोन खासदार निवडून आले होते.

    यापैकी एक जंगा रेड्डी हे पहिले होते. भाजपच्या प्रतिकूल काळात सी. जंगा रेड्डी यांनी पक्षाची सेवा केली. लोकसभेत पक्षाचे प्रभावी प्रतिनिधित्व केले. त्यांचे योगदान अतुलनीय होते अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

    The first BJP MP to be elected to the Lok Sabha after defeating Narasimha Rao in the Indira wave. Janga Reddy passes away

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा